मलठण येथे अवैध गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:20+5:302021-07-09T04:09:20+5:30

नीलेश जगन्नाथ लोंढे, गणेश मारुती शेंडगे (दोघेही रा. मलठण, ता. दौंड) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याबाबत स्थानिक ...

Illegal village distillery demolished at Malthan | मलठण येथे अवैध गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त

मलठण येथे अवैध गावठी दारूभट्टी उद्ध्वस्त

Next

नीलेश जगन्नाथ लोंढे, गणेश मारुती शेंडगे (दोघेही रा. मलठण, ता. दौंड) असे गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीवरून मलठण गावचे हद्दीत चव्हाणवस्ती येथे विहिरीचे कडेला असलेल्या गावठी दारूचे भट्टीवर छापा टाकला. तेथे नीलेश लोंढे, गणेश शेंडगे (दोघेही रा. मलठण ता. दौंड) हे दोघे गावठी दारू तयार करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांना ताब्यात घेऊन तेथील २०० लिटर मापाचे १८ प्लास्टिकचे बॅरल त्यामध्ये भरलेले ३ हजार ६०० लिटर कच्चे रसायन व ५०० लिटर मापाची एक लोखंडी पत्र्याची टाकी त्यामध्ये ४०० लिटर कच्चे रसायन असे एकूण ४००० लिटर कच्चे रसायन किं.१,२०,०००/- व इलेक्ट्रिक ब्लोअर, पाण्याची मोटर तसेच इतर साहित्य किं. रु. १६,४००/- असा एकूण कि.रु.१,३६,४००/- (एक लाख छत्तीस हजार चारशे रु.) साहित्य जप्त करण्यात आले.

हातभट्टी दारूची भट्टी लावून गावठी दारू गाळत असताना पोलिसांची चाहूल लागल्याने तेथून झाडाच्या आडोशाने काटवणातून पळून गेले. पुढील अधिक तपास दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे, महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अभिजित एकशिंगे यांनी केलेली आहे.

Web Title: Illegal village distillery demolished at Malthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.