महाराष्ट्रातल्या राजकारणात रस नाही :सुनील देवधर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 05:09 PM2018-03-12T17:09:02+5:302018-03-12T17:09:02+5:30
त्रिपुरात भाजपची सत्ता आल्यावर त्याचे श्रेय प्रभारी सुनील देवधर यांना देण्यात आले. निवडणुकीपूर्वी त्रिपुरात नेमकी काय परिस्थिती होती याची माहिती स्वतः देवधर यांनी दिली. मात्र आपल्याला पक्ष देईल ती जबाबदारी निभवायची असून महाराष्ट्राच्या राजकारणात रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले
पुणे : मला महाराष्ट्रातल्या राजकारणात रस नाही असे वक्तव्य भाजपचे त्रिपुराचे प्रभारी सुनील देवधर यांनी व्यक्त केले.पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते. पुढे ते म्हणाले की,मुंबईत सुरू असलेल्या शेतकरी मोर्च्याविषयी त्यांना विचारले असता त्यांनी मी फक्त त्रिपुरात बोलायला योग्य आहे.फडणवीस कार्यकुशल मुख्यमंत्री आहे. या संकटाचा मुख्यमंत्री आणि पक्ष म्हणून भाजप योग्य सामना करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्रिपुरात भाजपची सत्ता आली असली तरी पुढील सहा महिने पक्ष प्रवेश बंद असणार असल्याचे धोरण त्यांनी स्पष्ट केले.
लेनिन पुतळ्याच्या संदर्भात घडलेल्या घटनेवर बोलताना त्यांनी आम्ही त्या घटनेशी अजिबात सहमत नाही.. एखादा मूर्खपणा करतो त्याचे अनुकरण करत अजून चार जण करत असतील तरीही तो मुर्खपणाचं असतो. सध्या पुतळ्यांची चिंता कमी करून जिवंत माणसांची करायची गरज आहे असेही ते मतही त्यांनी मांडले.पुढे ते म्हणाले की, देशातील एकमेव त्रिपुरा राज्यात कम्युनिस्ट पक्षाची सत्ता होती. त्यामुळे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी कम्युनिस्टमुक्त भारतची जबाबदारी दिली असल्याचे त्यांनी सांगितले. त्रिपुरात कम्युनिस्ट पक्षाने कधीही प्रामाणिकपणे जिंकलेली नाहीये. त्यांचा पाया अपराध, बेईमानी आहे त्यामुळे त्यांच्याकडून प्रामाणिक कामाची अपेक्षा चुकीची आहे. यंदाची शंभर टक्के निवडणूक कॅमेऱ्याच्या नियंत्रणात झाली. त्यामुळे ईच्छा असूनही त्यांना काहीही करता आले नाही. 25 वर्ष कम्युनिस्ट सरकार असूनही त्रिपुरात आजही 67 टक्के लोक दारिद्रयरेषेखाली जगत आहेत.भारतात महिलांवर सर्वाधिक अत्याचार त्रिपुरात आहे. गुन्हे वेगवान आणि तपास संथ परिस्थिती आहे बलात्कार हा तिथे राजकीय सूड घेण्याचा प्रकार आहे. हा प्रकार फक्त कम्युनिस्ट सरकारच्या काळात होत होता असा आरोपही त्यांनी केला . माणिकसरकार ते फक्त निरुपयोगी मुख्यमंत्री होते. त्यांच्या खिशात 1300 रुपये, खात्यात 2300 रुपये मात्र 40 किलोमीटरसाठी खासगी हेलिकॉप्टर कसे वापरायचे असा सवालही त्यांनी विचारला.