‘आयएमए’चे राज्यभर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:09+5:302020-12-09T04:10:09+5:30
पुणे : आधुनिक वैद्यकातील ५८ शस्त्रक्रिया बीएएमएस झालेल्या आयुर्वेद पदवीधरांना करण्यास मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या ...
पुणे : आधुनिक वैद्यकातील ५८ शस्त्रक्रिया बीएएमएस झालेल्या आयुर्वेद पदवीधरांना करण्यास मान्यता देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वतीने मंगळवारी (८ डिसेंबर) राज्यभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला राज्यभरातील वैद्यक क्षेत्रातील ३४ संघटनांना पाठिंबा दिल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली.
‘आयएमए’कडून देशभरात या निर्णयाचा जाहीर निषेध केला जात आहे. मंगळवारी आयएमएच्या २१९ शाखातील ४५ हजार सदस्यांनी ठिकठिकाणी निदर्शने केली. राज्यातील सुमारे ४०० शहरे आणि गावांमध्ये पाच-पाचच्या गटाने डॉक्टर सहभागी झाले होते. आंदोलनाला नेत्र संघटना, नाक कान घसा तज्ज्ञ, पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ, फिजिशियन्स असोसिएशन, बालरोग तज्ज्ञ संघटना, मूत्रविकास संघटना यासंह ३६ वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस व पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
--------