Raj Thackeray: राज्यपालांची नक्कल, संजय राऊतांना टोला; म्हणाले, बाकी सगळं गुढीपाडव्याला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2022 09:24 PM2022-03-09T21:24:15+5:302022-03-09T23:12:27+5:30

मनसेचा १६ वा वर्घापनदिन बुधवारी सायंकाळी ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रिडा मंदिरात पार पडला

Imitation of the governorbhagat singh koshyari Criticism of Sanjay Raut nothing else Raj Thackeray speech in pune | Raj Thackeray: राज्यपालांची नक्कल, संजय राऊतांना टोला; म्हणाले, बाकी सगळं गुढीपाडव्याला!

छायाचित्र - तन्मय ठोंबरे

Next

पुणे : राज्यपाल समजत नाही त्या विषयात  बोलतात कशाला काही कळत नाही. दुसरे ते राऊत, काय बोलतात ते त्यांना तरी समजते काही नाही कोणास ठाऊक अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. आत्ता काही फार बोलणार नाही, २ एप्रिलला शिवतीर्थावर या असे निमंत्रण त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

मनसेचा १६ वा वर्घापनदिन बुधवारी सायंकाळी ठाकरे यांच्या उपस्थितीत गणेश कला क्रिडा मंदिरात झाला. वर्धापनदिनाचा कार्यक्रम पुण्यात प्रथमच होत असल्याने ठाकरे राज्यात सध्या सुरू असलेल्या इडीच्या धाडी व अन्य राजकीय हालचालींवर  काही आक्रमक बोलतील असे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र नक्कल करत त्यांनी राज्यपाल कोश्यारी, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. 

राज्यपाल कोश्यारी यांची नक्कलही केली

कोणाच्या आजारावर काही बोलायचे नाही, मात्र निवडणूका लांबणीवर जाण्याचे खरे कारण ते आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रत्यक्ष नाव न घेता ते म्हणाले. बाबासाहेब पुरंदरे यांना सॉफ्ट टारगेट केले गेले. त्यांना तुम्हाला जातीपातीतच गुंतवत ठेवायचे आहे. इतिहास काय लिहिला ते पहात नाहीत. कोणी लिहीला आहे ते पाहतात. हा माझा शिष्य असे रामदासांनी म्हटले नाही व हे माझे गुरू असे छत्रपती शिवाजी महाराजांनीही म्हटले नाही. मग समजत नाही त्यावर राज्यपाल बोलतात कशाला असा प्रश्न करत ठाकरे यांनी राज्यपाल कोश्यारी यांची नक्कलही केली. रामदासांनी महाराजांना श्रीमंत योगी म्हटले आहे. आता इडीची धाड पडली की योगी कोण ते समजते असे ठाकरे म्हणाले.

''खासदार संजय राऊत काय बोलतात हे त्यांना तरी कळते का, भविष्यातील पिढ्या आपल्याकडे पहात आहेत याचे त्यांनी भान ठेवावे, आजच्या मुलांना पुढे जाऊन असे वाटेल की राजकारणात असेच बोलतात अशी टीका त्यांनी केली. कोराना काळात जनतेला मदत केली, लोकांचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून लोक आपल्याकडे येतात, १६ वर्षातील हीच आपली कमाई आहे असे सांगत ठाकरे यांनी मनसैनिकांना वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.''

Web Title: Imitation of the governorbhagat singh koshyari Criticism of Sanjay Raut nothing else Raj Thackeray speech in pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.