अवसारीतील जळीत उसाचे त्वरित पंचनामे करावेत, हर्षवर्धन पाटलांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 04:44 PM2021-11-13T16:44:05+5:302021-11-13T16:54:58+5:30
हा प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या निष्क्रिय झालेल्या लाईनमुळे घडला असून अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले
बारामती: अवसरी येथील शुक्रवारी (दि.12) झालेल्या जळीत ऊस पिकाची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पाहणी केली. यावेळी शासनाने पंचनामे करून अवसरी येथील शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी केली. हर्षवर्धन पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी जीवापाड कष्ट करून ऊस पीक सांभाळले होते. त्याला तोड ही आली होती परंतु अचानक लागलेल्या आगीने 35 एकरांतील ऊस जळून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाला विनंती केली आहे की त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी.
हा प्रकार महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या निष्क्रिय झालेल्या लाईनमुळे घडला असून अनेक ठिकाणी तारा जीर्ण झाल्या असल्याने स्पार्किंग होण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे मत माजी मंत्री पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा, संचालक शांतीलाल शिंदे ,रवींद्र सरडे, अवसरीचे सरपंच संदेश शिंदे, भाट निमगावगावचे सरपंच अजित खबाले, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय शिर्के, आदित्य शिंदे अंकुश जाधव, दत्तात्रय मगर, पोपट गायकवाड शेतकरी उपस्थित होते.