खेळताना दगड गिळल्याने श्वास कोंडलेल्या चिमुरडीला तत्पर उपचारामुळे जीवदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 16:24 IST2020-02-10T16:22:59+5:302020-02-10T16:24:44+5:30
ऊसतोडणी सुरु असताना ५ महिन्याच्या चिमुरडीने चुुकुन तोंडात दगड घातला.

खेळताना दगड गिळल्याने श्वास कोंडलेल्या चिमुरडीला तत्पर उपचारामुळे जीवदान
बारामती : खेळताना दगड गिळल्याने श्वास कोंडलेल्या ५ महिन्यांच्या चिमुरडीला तत्पर उपचारामुळे जीवदान मिळाले.भाग्यश्री सदानंद पिंपळे असे या बालिकेचे नाव आहे. पिपळे कुटुंबिय मुळ साकी धुळे येथील आहे. हे कुटुंब ऊसतोडणीसाठी इंदापुर येथे आले आहे.
रविवारी(दि ९) ऊसतोडणी सुरु असताना ५ महिन्याच्या चिमुरडीने चुुकुन तोंडात दगड घातला. हा दगड घशात अडकला.त्यामुळे तिचा श्वास कोंडण्यास सुरवात झाली.त्यामुळे पिंपळे कुंटुंबिय घाबरुन गेले. हातावरचे पोट असणाऱ्या या कुटुंबावर मोठे संकट कोसळले.मात्र,बाळाला बारामतीला घेवुन जा,त्याला काही होणार ना.असे सांगत काही जणांनी त्यांना धीर दिला.
यांनी तातडीने बारामती येथील डॉ राजेंद्र मुथा यांच्या रुग्णालयात बाळाला उपचारासाठी आणले.यावेळी डॉ. राजेंद्र मुथा,डॉ सौरभ मुथा यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखुन त्वरीत उपचार सुरु केले.भुलतज्ञ डॉ. अमर पवार यांना बोलावुन स्कोपीद्वारे घशात अडकलेला दगड योग्यरीत्या काढुन बाळाला जीवदान दिले. मुथा पितापुत्रांनी तत्परतेने केलेल्या उपचारामुळे भाग्यश्रीला जीवदान मिळाले.
——————————