घरीच करा गणेशमूर्तीचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:12 AM2021-09-18T04:12:04+5:302021-09-18T04:12:04+5:30

बारामती : अनंत चतुर्दशीला श्री गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करण्याबाबतच्या मागदर्शक सूचना मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद यांनी ...

Immerse Ganesha idol at home | घरीच करा गणेशमूर्तीचे विसर्जन

घरीच करा गणेशमूर्तीचे विसर्जन

Next

बारामती : अनंत चतुर्दशीला श्री गणेशमूर्तींचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करण्याबाबतच्या मागदर्शक सूचना मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद यांनी जारी केल्या आहेत. ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुका काढू नयेत, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

बारामती नगर परिषदेमार्फत नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये ‘श्रीं’चे विसर्जन मर्यादित जल्लोषासह शक्यतो घरच्या घरी करावे. ‘श्रीं’च्या विसर्जन मिरवणुका काढू नयेत, तसेच पारंपरिकरीत्या विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. कोरोना प्रादुर्भावामुळे ‘श्रीं’च्या विसर्जनावेळी मास्क वापरणे बंधनकारक आहे. ‘श्रीं’च्या विसर्जनावरून आल्यावर हात साबणाने धुवावेत. ‘श्रीं’च्या विसर्जनावेळी लहान मुले व वृद्धांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. ‘श्रीं’चे विसर्जन करतेवेळी गणेशभक्तांनी सुरक्षित अंतर ठेवावे. सर्व गणेशभक्तांनी त्यांच्याकडे जमा झालेले निर्माल्य व पूजेचे सहित्य निर्माल्य कुंड्यामध्ये जमा करावे.

प्रदूषणमुक्त पर्यावरणाच्या व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील २५ ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम जलकुंभाची आणि खास विसर्जनाकरिता तयार केलेल्या 15 फिरत्या विसर्जन रथांचीदेखील व्यवस्था प्रशासनाने केलेली आहे. सदरील विसर्जन रथ सकाळपासून शहरांतून फिरून मूर्ती संकलन करणार आहेत. सदरहू ठिकाणीच श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

--------------------

शहरातील कृत्रिम जलकुंभाची व्यवस्था :

धो.आ. सातव शाळा, जगताप मळा, बा.न.प. शाळा क्र.२, कसबा, महात्मा फुले समाजमंदिर पानगल्ली, मंडई. क्षत्रीयनगर समाजमंदिर, टकार कॉलनी, शाहू हायस्कूल पाटस रोड, आर. एन. आगरवाल टेक. हायस्कूल, म.ए.सो. हायस्कूल, बारामती, रमाई माता भवन, टेलिफोन ऑफिससमोर आमराई, मूकबधिर शाळा, कारभारीनगर कसबा, जि.प. प्राथमिक शाळा, शारदानगर, चिंचकर शाळा, सपनानगर, जि.प. प्राथमिक शाळा तांदूळवाडी, जि.प. शाळा, जळोची क्षेत्रीय कार्यलयामागील, सूर्यनगरी, मंडई शेजारील अंगणवाडी, कविवर्य मोरोपंत शाळा, श्रीरामनगर, देसाई इस्टेट जि.प. शाळा, ढवाण वस्ती शाळा, मोरगाव रोड, रयत भवन मार्केट यार्ड, गावडे हॉस्पिटल शेजारी, देवळे इस्टेट विद्या प्रतिष्ठान प्राथमिक शाळा रुई ग्रामीण हॉस्पिटलशेजारी, जि.प. शाळा जुनी सातव वस्ती, माळेगाव रोड, जि.प. शाळा रुई, बा.न.प. शाळा क्र.3 सिद्धेश्वर गल्ली, बा.न.प. शाळा क्र. 5 शारदा प्रांगण, फलटण रोड, राजगड हाइटस्, गाळा क्र. 4, 5 नीलम पॅलेस चौक.

-------------------

Web Title: Immerse Ganesha idol at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.