यवत व परिसरात मिरवणुका न काढता साधेपणाने गणेश विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:25+5:302021-09-22T04:13:25+5:30
सर्वच सार्वजनिक गणेश मंडळे मंडपात आरती करून विसर्जनासाठी गणेश मूर्ती घेऊन गेले. यवतमध्ये नूतन तरुण मंडळ व श्रीनाथ मित्र ...
सर्वच सार्वजनिक गणेश मंडळे मंडपात आरती करून विसर्जनासाठी गणेश मूर्ती घेऊन गेले. यवतमध्ये नूतन तरुण मंडळ व श्रीनाथ मित्र मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन वेगवेगळ्या मिरवणुका काढल्या जातात. वेगवेगळी सार्वजनिक गणेश मंडळे या मिरवणुकांमध्ये सहभागी होतात. मात्र, यंदादेखील विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी असल्याने सर्वच मंडळांनी शांततेत गणेश विसर्जन केले. मानाचा पहिला असलेल्या नूतन तरुण मंडळाने सकाळी साडेदहा वाजता आरती करून गणेश विसर्जन केले. श्रीनाथ मित्रमंडळाच्या मंडपात अखेरच्या दिवशी दर्शनासाठी पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी हजेरी लावली. यावेळी मनोज देशपांडे, जयदीप कांचन, पंचायत समिती माजी सदस्य कुंडलिक खुटवड, दिलीप यादव, विलास दोरगे, दिलीप अदापुरे, रोहन दोरगे, मयुर दोरगे आदी उपस्थित होते.
काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मंडपासमोर ध्वनिप्रक्षेपक लावून नाचण्याचा आनंद घेतला. मात्र, दरवर्षी होणारी गुलालाची उधळण, ढोल ताशांचा गजर आणि डीजेचा दणदणाट कुठेही नव्हता.
210921\20210921_175856.jpg
फोटो ओळ :- यवत येथील श्रीनाथ गणेश मंडळाच्या गणपती विसर्जन दिवशी भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी उपस्थिती लावली.