पुण्यातील गणपतींचे थाटात विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या च्या निनादात भावपूर्ण निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 02:00 AM2019-09-13T02:00:31+5:302019-09-13T02:01:20+5:30

पारंपारिक वेशभूषेत अश्वारूढ कार्यकर्ते सहभागी झाले. ‘विष्णूनाद’च्या कार्यकतर््यांनी पालखी पुढे शंखनाद करून वातावरण निर्मिती केली.

Immersion in the tune of Ganpati in Pune; A sentimental message in the vein of this early next year | पुण्यातील गणपतींचे थाटात विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या च्या निनादात भावपूर्ण निरोप

पुण्यातील गणपतींचे थाटात विसर्जन; पुढच्या वर्षी लवकर या च्या निनादात भावपूर्ण निरोप

googlenewsNext

पुणे : फुलांची पखरण, रांगोळयांच्या पायघड्या, आकर्षक रंगावली, ढोलताशाचा गजर, सनईचौघड्याचे मंगलमयी सूर, बाप्पाचा जयघोष अन आबालवृद्धांचा उत्साह...अशा जल्लोषपूर्ण वातावरणात गुरूवारी पुण्याचा वैभवशाली मिरवणूक सोहळा रंगला. ऐतिहासिक परंपरा असलेल्या मानाच्या पाच गणपतींना वाजतगाजत ह्यगणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या च्या निनादात भावपूर्ण निरोप देण्यात आला. विसर्जन मिरवणुकीत ‘श्रीं’वर वर्षासरींची उधळण झाली.

दरम्यान, मिरवणुकीच्या मार्गावर पथकांच्या जागोजागी होणा-या स्थिरवादनाने मिरवणूक काहीशी रेंगाळल्याचे चित्र पाहायला मिळाले. तरीही गतवर्षीच्या तुलनेत हा सोहळा अर्धा तास आधी संपला. गेल्या वर्षी ही मिरवणूक साडेआठ तास चालली. यंदाच्या वर्षी मानाच्या शेवटच्या केसरीवाड्याच्या गणपतीचे विसर्जन पांचाळेश्वर घाटावर 6 वाजून 30 मिनिटांनी झाले.

मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला मंडईच्या लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला. महापौर मुक्ता टिळक, खासदार गिरीश बापट, शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची आरती करून मिरवणुकीचा ह्य ह्यश्रीगणेशाह्ण करण्यात आला.

भाजप शहराध्यक्ष माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त सौरभ राव, पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी आमदार मोहन जोशी, शरद रणपिसे, नगरसेवक प्रसन्न जगताप, महेश लडकत, आदित्य माळावे, राजेश येनपुरे, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, गायत्री खडके, मनीषा लडकत, रिपाईचे मंदार जोशी यावेळी उपस्थित होत्या. तसेच उप महापौर सिध्दार्थ धेंडे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कसबा गणपतीला हार घालून ‘श्रीं’चे दर्शन घेतले.

मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीत पारंपारिक वेशभूषा परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या. दरवर्षीप्रमाणे रमणबाग प्रशाला, रूद्रगर्जना आणि कलावंतांचे ढोलताशा पथक तसेच प्रभात बँड, मुलींचे ढोलताशा पथक आणि मिरवणुकीत पायी सहभागी होणा-या दिंड्या हे प्रमुख आकर्षण ठरले. डेक्कनच्या पुलाची वाडी येथे पर्यावरणपूरक पद्धतीने सायंकाळी ४.३० वाजता मानाच्या पहिल्या गणपतीचे विसर्जन झाले. मानाच्या दुस-या श्री तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रारंभी सतीश आढाव यांचे नगारा वादन होते.

पारंपारिक वेशभूषेत अश्वारूढ कार्यकर्ते सहभागी झाले. ‘विष्णूनाद’च्या कार्यकतर््यांनी पालखी पुढे शंखनाद करून वातावरण निर्मिती केली. अब्दागिरी, मानचिन्हे आणि चांदीच्या पालखीत ‘श्रीं’ची लोभस मूर्ती विराजमान होती. साधुसंतांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या समर्थ प्रतिष्ठान पथकातील वादकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शिवमुद्रा ढोलताशा पथक आणि न्यू गंधर्व ब्रास बँडचा देखील मिरवणुकीत समावेश होता. पहिल्या गणपतीनंतर वीस मिनिटातच म्हणजे 4 वाजून 50 मिनिटांनी मानाचा दुसरा गणपती विसर्जित झाला.

या दोन मंडळानंतर काहीसे अंतर पडले. पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाची विसर्जन मिरवणुक बेलबाग चौकात काहीसा विलंब लागला. मिरवणुकीत जयंत नगरकर यांचे नगारा वादन ,अश्वराज बँड ,अतुल बेहरे यांचे नादब्रह्म पथक , गर्जना पथकाचा समावेश होता. मुक्तहस्ताने मंडळाचे कार्यकर्ते गुलालाची उधळण करीत होते. श्रीं च्या मिरवणुकी साठी सुभाषशेठ व स्वप्निल सरपाले यांनी साकार केलेला फुलांचा ह्य हरे कृष्णा रथ ह्य आकर्षक रथ लक्षवेधी ठरला. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या रथामध्ये दोन गोंधळींचे सादरीकरण प्रभावी ठरले. मानाचा चौथ्या श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ ट्रस्टच्या मिरवणुकीत लोणकर बंधूचा नगारा वादन , स्वरूप वर्धिनी , गजलक्ष्मी ढोल ताशा पथक तसेच हिंद तरूण मंडळ गावठी ढोल लेझीम ओम नमो परिवार महिलांचे सामाजिक जनजागृती पथक सहभागी झाले होते. युवा शिल्पकार विपुल खटावकर यांनी फायबर ग्लास व फुलांनी सजवलेला आकर्षक मयूर रथ मिरवणुकीचे आकर्षण ठरला.

Web Title: Immersion in the tune of Ganpati in Pune; A sentimental message in the vein of this early next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.