सासूच्या प्रियकरासोबत सुनेचे अनैतिक संबंध; काटा काढत रचला सुनेच्या आत्महत्येचा बनाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 07:51 PM2021-03-24T19:51:01+5:302021-03-24T19:54:55+5:30
मौजे निमगाव केतकी येथील घटना चार आरोपींना अटक
बाभुळगाव : निमगाव केतकी (ता.इंदापूर) येथे सासुच्या प्रियकरासोबत सुनेचे अनैतिक संबध असल्याच्या संशयातुन २१ वर्षीय विवाहीतेचा सासरच्यांनी दोरीने गळफास देवुन खुन केल्याची घटना घडली आहे.खुन करून मृृतदेह ओढणीच्या सहाय्याने लोखंडी अँगलला अडकवला. व गळफास घेवुन आत्महत्या केल्याचा खोटा बनाव रचला. ही घटना शनिवारी सायंकाळी राहत्या घरात ही घटना घडली आहे.
याप्रकरणी मयत विवाहितेची आई सावित्री उर्फ आक्काबाई हरी नाळे (वय ४८ रा.निमगाव केतकी, ता.इंदापूर) यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. इंदापूर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
राणी किरण भोंग (वय २१, रा.इरिगेशन बंगला,निमगाव केतकी,ता.इंदापूर) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सासू शोभा बाळु भोंग (सासू), सासरा बाळु नामदेव भोंग, दिर सुनिल बाळु भोंग व पती किरण बाळु भोंग (सर्व रा.इरिगेशन बंगला, निमगाव केतकी, ता.इंदापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीत म्हटले आहे की, मयत विवाहितेची सासु शोभा भोंग हिचे हुलगे नावाच्या इसमाबरोबर अनैतिक संबध होते.तर सुनेचेही वरील हुलगे नावाच्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय तिची सासु, सासरा, पती व दीर यांना आला होता. याच संशयावरून वरील सर्वांनी संगनमत करून जाणीवपूर्वक विवाहितेचा दोरीने गळा आवळुन खून केला.त्यानंतर मयत विवाहितेच्या गळ्यात ओढणी बांधुन मृृृृतदेह घरातील खोलीच्या लोखंडी अँगलला अडकवला व आतुन दरवाजा बंद करून खिडकीतुन बाहेर येत विवाहितेने गळफास घेतल्याचा बनाव केला.
त्यानंतर रविवारी ( दि.२१) अंत्यविधीवेळी मृृृृत राणीची सासु शोभा भोंग हिने फिर्यादी यांना धमकी देत राणीला संपवले आहे.पोलिसात तक्रार केल्यास तुझ्या दोन मुलांनाही संपवून टाकीन अशी धमकी दिली व फिर्यादीच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
मृृृृत राणीच्या वैद्यकीय तपासणीमध्ये दोरीने गळा आवळल्याचे स्पष्ट झाले असून इंदापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर, इंदापूर प्रभारी पोलीस निरिक्षक धन्यकुमार गोडसे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धोतरे हे करत आहेत.
————————————————————————