अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पत्नीला तिसर्‍या मजल्यावरुन ढकलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:39 PM2017-10-30T12:39:39+5:302017-10-30T13:24:12+5:30

नवीन फ्लॅट बुक करण्याचा बहाणा करून पतीनेच पत्नीचा इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून ढकलून तिचा खून केल्याचा प्रकार चर्‍होली (ता. खेड) या ठिकाणी घडला. 

Immoral relationships push the wife who is disturbing from the third floor | अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पत्नीला तिसर्‍या मजल्यावरुन ढकलले

अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पत्नीला तिसर्‍या मजल्यावरुन ढकलले

googlenewsNext
ठळक मुद्देयाप्रकरणी पतीसह अन्य दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करून अटकदेविदासचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याची माहिती मंदाला लागल्याने त्यांच्यात सतत भांडण होत.

शेलपिंपळगाव : अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या पत्नीला नवीन फ्लॅट बुक करण्याचा बहाणा करून पतीने इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून ढकलून दिले. यामध्ये पाथर्डीच्या मंदा देविदास पालवे (वय २८) या विवाहितेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पतीसह अन्य दोघांवर खूनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी फिर्याद मयत मंदा पालवे यांचा भाऊ आदिनाथ गोरक्ष खेडकर (रा. चिंचपूरी हिझवे, ता. पाथर्डी, जि. नगर) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना चर्‍होली खुर्द (ता. खेड) गावच्या हद्दीत घडली. आरोपी देविदास पालवे आणि मृत मंदा पालवे हे नगर जिल्ह्यातील पती-पत्नी असून देविदास याचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. याची माहिती पत्नी मंदा हिला लागल्याने त्यांच्यात सतत भांडण होत होते. आरोपीने मंदा पालवे यांना आपण फ्लॅट घेवून राहू, असे सांगून आळंदीत आणले. आळंदी जवळील चर्‍होली खुर्दच्या एका सोसायटीत त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडे पालवे पती-पत्नी आणि त्यांची दोन मुले रात्रभर मुक्कामी राहिले. त्यानंतर सकाळी दोघेही चर्‍होलीतील नातेवाईकांच्या सोसायटीजवळच नवीन सुरू असलेले फ्लॅटचे बांधकाम पाहण्यासाठी गेले. मात्र तेथे कुलूप असूनही कुणाची परवानगी न घेता त्यांनी इमारतीत प्रवेश करून सर्वजण पाचव्या मजल्यावर गेले. मात्र पुन्हा खाली येताना पत्नीला देविदासने तिसर्‍या मजल्यावरून खाली ढकलून दिले. या घटनेत पालवे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. परंतु आरोपी देविदासने ती पाय घसरून पडली असा बहाणा करत जखमी पत्नीला उपचारासाठी भोसरीतली खासगी रूग्णालयात नेले. मात्र तेथे पोचल्यावर पालवे यांचा मृत्यू झाला. दरम्यान आदिनाथ खेडकर यांच्या फिर्यादीवरून आळंदी पोलिसांनी देविदास पालवे आणि घुले यांनी अटक केली. तर अल्पवयीन आरोपीस ताब्यात घेतले. अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत

Web Title: Immoral relationships push the wife who is disturbing from the third floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.