कोरोनाकाळात आयुर्वेदाच्या माध्यमातून वाढवावी प्रतिकारशक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:12+5:302021-06-29T04:08:12+5:30
गेल्या २३ वर्षांपासून डॉ. सत्यन गुजर हे सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, त्वचाविकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व, किडनीविकार, हृदयविकार, ...
गेल्या २३ वर्षांपासून डॉ. सत्यन गुजर हे सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, त्वचाविकार, स्त्री-पुरुष वंध्यत्व, किडनीविकार, हृदयविकार, कॅन्सर यांवर चिकित्सा करतात. यामध्ये प्रामुख्याने सांध्यांचे आजार, पाठीच्या मणक्यांचे विकार, पोटाचे विकार, त्वचाविकार यावर ते उपचार करतात. आज कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. अनेक रुग्ण ॲलोपॅथी उपचार घेत असतात. काही केसमध्ये इतक्या गंभीर बनले असतात की, त्यांना काही महिन्यांचा अवधी दिला गेलेला असतो. अशा रुग्णांनाही शेवटी आयुर्वेदाच्या उपचारानेच नवे आयुष्य मिळाले असल्याचे सांगत डॉ. सत्यन गुजर म्हणाले की, ज्यांना १५ ते २० वर्षांपासून सांधेदुखीचे, पाठीच्या मणक्याचे आजार आहेत, अशा रुग्णांना शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. पण, तरीही त्यांची या आजारातून सुटका होत नाही. अशा वेळी आपल्याकडील पंचकर्मसारखे उपचार करून घेऊन आज हे रुग्ण ठणठणीत आहेत. साधारण आतापर्यंत १ लाखाहून अधिक रुग्णांवर आपण उपचार केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्यासाठी कोरोना हे एक नवे संकट आहे. कोरोनाबाधित रुग्णांची अवस्था अत्यंत गंभीर असल्याचेही पाहायला मिळाले. या काळात ॲलोपॅथीमध्ये उपचार घेणार अनेक जण आयुर्वेदाकडे वळले. महत्त्वाचे म्हणजे कोरोनामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी विविध काढे, त्याचबरोबर काही गोळ्या घेतल्या. वास्तविक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे धोकादायक ठरू शकते. ॲलोपॅथीमध्ये उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी काही केल्या वाढत नसल्याच्या रुग्णांनीही आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर बरे झाले आहे. कोरोनाकाळात केवळ आयुर्वेदिक उपचार घेऊन आतापर्यंत २०० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत आहेत. त्यामुळे सर्वांनी आतापासून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेणे आवश्यक आहे. म्हणजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही गोळ्या औषधे जर आतापासूनच घेतल्या तर त्यावेळी होणारा त्रास कमी होईल, असेही ते म्हणाले.