बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:16 AM2021-09-08T04:16:03+5:302021-09-08T04:16:03+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : बदलत्या हवामानाचा विविध पिकांच्या मॉडेल्सवर परिणाम होतो आहे. त्याचा अभ्यास महत्वाचा असून त्यानुसार पिक ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बदलत्या हवामानाचा विविध पिकांच्या मॉडेल्सवर परिणाम होतो आहे. त्याचा अभ्यास महत्वाचा असून त्यानुसार पिक नियोजन गरजेचे असल्याचे मत गुजरातमधील आणंद कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. सी. वार्ष्णेय यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र व ग्रामीण विकास व शिक्षण संस्था यांनी आयोजित केलेल्या शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्रात डॉ. वार्ष्णेय बोलत होते. या ऑनलाईन चर्चासत्रात महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, सेंटर फोर एज्युकेशन, रिसर्च एन्ड ग्रोथ (सीईआरजी)चे उपाध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान प्रकल्पाचे समन्वयक डॉ. सुनिल गोरंटीवार सहभागी झाले होते.
डॉ. वार्ष्णेय म्हणाले, “वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे वाढते प्रमाण, वृक्षतोड, वणवा, औष्णिक विद्युत केंद्र अशा विविध कारणांमुळे तापमान वाढत आहे. त्याचाही अभ्यास व्हायला हवा.” डॉ. प्रशांतकुमार पाटील म्हणाले की, अशा वातावरणाचा विचार करून कमी कालावधीत तयार होणाऱ्या, कमी पाण्यावर तग धरू शकणाऱ्या, कीड व रोगास प्रतिकार करू शकणाऱ्या पिकांच्या जाती, हवामानाबद्दल पूर्वसूचना देणारे मॉडेल्स यावर संशोधन आवश्यक आहे.