एमआयएमचाही प्रभाव
By admin | Published: February 24, 2017 03:50 AM2017-02-24T03:50:38+5:302017-02-24T03:50:38+5:30
पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच प्रवेश केलेल्या आॅल इंडिया मजिलिस-ए-इत्तेहदूल मुस्लीमीन (एमआयएम) या
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रथमच प्रवेश केलेल्या आॅल इंडिया मजिलिस-ए-इत्तेहदूल मुस्लीमीन (एमआयएम) या पक्षाच्या उमेदवारांनी लक्षणीय मते मिळवत आपला प्रभाव निर्माण केला. येरवडा परिसरात एमआयएमच्या अश्विनी लांगडे या विजयी ठरल्या.
प्रभाग क्र. १८ मध्ये मध्ये रेखा चव्हाण (३०३४), फरिदा खान (३३६७), फरिद खान (२४६९), उमर बागवान (३९२३) या उमेदवारांनी लक्षणीय मते मिळाली. एमआयएमच्या निवडणुकीतील प्रभावामुळे काँग्रेसच्या उमेदवारांना मोठा फटका बसला.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेना आणि एमआयएमच्या उमेदवारांविरोधात लढत झाल्याचे पहायला मिळाले. एमआयएम पक्षाच्या महिला उमेदवारांनी अटीतटीची लढत दिली. त्यात एमआयएमच्या अश्विनी लांडगे यांनी शिवसेनेच्या तृप्ती शिंदे यांना शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत दिली. प्रभाग क्रमांक सहा अ मधून शिवसेनेचे अविनाश साळवे, ब मधून शेवा चव्हाण आणि ड मधून संजय भोसले यांनी विजय मिळवला आहे. साळवे यांना एमआयएमच्या शैलेंद्र भोसले यांनी लढत दिली. प्रभाग क्र. १९ मध्ये अफसरी शेख (४५८६), शेख हसीना (३४५४), जुबेर शेख (३७१६) यांनी भाजपच्या उमेदवारांना चुरशीची लढत दिली. दरम्यान, निवडणूक काळात एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यात दोन सभा झाल्या.
बसपनेही केली दमछाक
ताडीवाला रोड प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांची बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांनी चांगलीच दमछाक केली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांच्या विरोधातील सुर्यकांत निकाळजे सलग तीन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर होते. शेवटच्या काही फेऱ्यात शिंदे यांना आघाडी मिळाली. या मतदार संघातील महिला उमेदवारांनीही लक्षणीय मते घेतली.