Pune Airport | पुणे विमानतळावर विमानाचे टायर फुटल्याने उड्डाणांवर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 03:33 PM2022-03-30T15:33:19+5:302022-03-30T16:20:43+5:30
विमानाचे टायर फुटल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल...
पुणे :लोहगाव विमानतळावरून (pune international airport) जाणाऱ्या सुखोई विमानाचे टायर फुटल्यामुळे विमानांच्या उड्डाणावर मोठा परिणाम झाला आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
लोहगाव विमानतळावर उड्डाण करत असतानाच सुखोई विमानाचे टायर फुटले. त्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली आहे. यामुळेच विमानतळ प्रशासनाने तत्काळ विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, प्रवाशांना आता विमानतळावरच थांबावे लागत आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात प्रचंड गर्दी झाली आहे.
याबाबत विमानतळ संचालकांना विचारले असता, त्यांनी या घटनेची कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले असून, धावपट्टी हवाई दलाच्या अखत्यारित असल्यामुळे अधिक माहितीसाठी हवाई दलाशी संपर्क साधावा, असे सांगितले आहे. विमानाचा टायर फुटल्यामुळे धावपट्टी देखील खराब झाली आहे. त्यामुळे इतर विमानांच्या उड्डाणांना विमानतळ प्रशासनाने तात्काळ थांबवले आहे.
यामुळे सकाळपासूनच प्रवाशांना आता तासन्तास थांबावे लागत आहे. विमानतळाचे दिवसाचे 70 ते 80 विमान उड्डाणांचे शेड्यूल ठरलेले असते. मात्र या घडलेल्या घटनेमुळे पुर्ण शेड्युलवर परिणाम होणार आहे. याचा फटका विमानतळ प्रशासनासोबतच सर्वाधिक प्रवाशांनाच बसणार आहे.