नीरा-लोणंद दरम्यान रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वे गाड्यांवर परिणाम

By नितीश गोवंडे | Published: August 18, 2023 07:28 PM2023-08-18T19:28:19+5:302023-08-18T19:30:03+5:30

प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी असे आवाहन पुणे रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे...

Impact on trains due to railway track doubling work between Neera-Lonand | नीरा-लोणंद दरम्यान रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वे गाड्यांवर परिणाम

नीरा-लोणंद दरम्यान रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाच्या कामामुळे रेल्वे गाड्यांवर परिणाम

googlenewsNext

पुणे : मध्य रेल्वेच्यापुणे विभागातील पुणे - सातारा रेल्वे मार्गावरील नीरा - लोणंद रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेऊन वर्तमान डाऊन मेन रेल्वे मार्गाला नवीन तयार होत असलेल्या रेल्वे मार्गासोबत जोडण्याचे आणि इतर महत्वपूर्ण कामे केली जाणार आहेत.

यामुळे येत्या रविवारी (२० ऑगस्ट) रोजी रेल्वे नं. ११४२५ पुणे - कोल्हापुर डेमू एक्स्प्रेस पुणे ऐवजी सातारा येथून कोल्हापूरला सोडण्यात येईल तसेच कोल्हापूर येथून पुण्यासाठी सुटणारी रेल्वे नं. ११४२६ कोल्हापुर - पुणे डेमू एक्स्प्रेस गाडीचा प्रवास सातारा येथेच समाप्त होईल. म्हणजेच ही गाडी पुणे - सातारा - पुणे दरम्यान रद्द राहील. तसेच शनिवार (१९ ऑगस्ट) रोजी चंदीगड येथून सुटणारी रेल्वे नं. २२६८६ चंदीगड - यशवंतपुर एक्स्प्रेस दौंड - कुर्डूवाडी - मिरज या बदललेल्या मार्गाने चालवण्यात येईल. त्यामुळे ही रेल्वे पुणे स्थानकावर येणार नाही. तसेच शनिवार (१९ ऑगस्ट) रोजी बंगळुरू येथून सुटणारी रेल्वे नं. १६५०६ बंगळुरू - गांधीधाम एक्स्प्रेस गाडीला मिरज - लोणंद दरम्यान थोडा विलंब होईल, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी अशी माहिती पुणे रेल्वे विभागातर्फे देण्यात आली.

Web Title: Impact on trains due to railway track doubling work between Neera-Lonand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.