बारामती वैद्यकीय महाविद्यालयाचा पॅटर्न राज्यात राबवा : शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:28+5:302021-07-14T04:15:28+5:30
बारामती : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा व सर्वोपचार रुग्णालय पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवला जावा, अशा शब्दांत ...
बारामती : बारामती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा व सर्वोपचार रुग्णालय पॅटर्न राज्यात सर्वत्र राबवला जावा, अशा शब्दांत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी येथील वैद्यकीय महाविद्यालय व्यवस्थापनाचे कौतुक केले.
बारामती येथील शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी पवार यांनी केली. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. जिल्हास्तरावरील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची केंद्राने घोषणा केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाची प्रतिकृती आदर्शवत असून राज्यात सर्वत्र बारामतीच्या धर्तीवर वैद्यकीय महाविद्यालय निर्माण व्हावीत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. तसेच अधिष्ठाता कार्यालयात सर्व विभागप्रमुखांशी त्यांनी संवाद साधला. भविष्यातील संकल्पनांविषयी माहिती घेत महाविद्यालयात नव्याने उभारलेल्या आॅक्सिजन जनरेशनची त्यांनी पाहणी केली. परिसरात पवार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या वेळी सदानंद सुळे, सिम्बॉयसिस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विद्या मुजुमदार, डॉ. राजीव, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे, विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बारामती येथील शासकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची पाहणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
१३०७२०२१ बारामती—३१