कोरोना काळात जगात वाढली आयुर्वेदाची महती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:17 AM2021-08-17T04:17:38+5:302021-08-17T04:17:38+5:30

पुणे : “कोरोना काळात आयुर्वेदामधील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अ‍ॅलोपॅथीमधील गुंतागुंतीचे उपचार करण्याची क्षमता अशा संकल्पनांचा उपयोग आवश्यक आहे. कोरोना ...

The importance of Ayurveda increased in the world during the Corona period | कोरोना काळात जगात वाढली आयुर्वेदाची महती

कोरोना काळात जगात वाढली आयुर्वेदाची महती

Next

पुणे : “कोरोना काळात आयुर्वेदामधील प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि अ‍ॅलोपॅथीमधील गुंतागुंतीचे उपचार करण्याची क्षमता अशा संकल्पनांचा उपयोग आवश्यक आहे. कोरोना काळात आयुर्वेद आणि अ‍ॅलोपॅथीला समान पातळीवर आणण्याचे काम झाले. सध्या आयुर्वेद मोठ्या स्थित्यंतरामधून जात असून कोरोना काळात जागतिक स्तरावर आयुर्वेदाचे महत्त्व वाढले आहे,” असे मत केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सल्लागार डॉ. भूषण पटवर्धन यांनी व्यक्त केले.

आयुर्वेद टीचर्स असोसिएशनतर्फे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या मान्यतेने अद्ययावत आयुर्वेद या विषयावर तिसऱ्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी डॉ. पटवर्धन बोलत होते. आयुर्वेद टीचर्स असोसिएशनचा जीवनगौरव पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आयुर्वेद शाखेचे माजी अधिष्ठाता डॉ. विजय डोईफोडे आणि सांगलीचे डॉ. श्याम शृंगारे यांना यावेळी प्रदान करण्यात आला. आमदार लहू कानडे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर, असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राहुल सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. नितीन चांदुरकर, सचिव डॉ. मनोज चौधरी, डॉ.संदीप जाधव, डॉ. अर्पणा सोले, डॉ. नितीन वाघमारे आदी यावेळी उपस्थित होते. उत्तम प्रशासक पुरस्कार सहाय्यक आयुष संचालक डॉ. व्यंकट धर्माधिकारी आणि एमसीआयएमचे प्रबंधक डॉ. दिलीप वांगे यांना देण्यात आला.

डॉ. पटवर्धन म्हणाले की, ब्रिटिश राजवटीत आयुर्वेद संपवण्याचा प्रयत्न झाला. परंतु आता आयुष आणि आयुर्वेदाला चांगले भविष्य आहे. आयुर्वेद आणि योगाचा झेंडा तरुण पिढी सर्वदूर फडकवत आहे. त्यांना योग्य मार्ग दाखविण्याचे काम आयुर्वेद शिक्षकांनी करायला हवे. डॉ. विहार बिडवई व डॉ. शिल्पा रेवले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आनंद मादगुंडी यांनी आभार मानले.

Web Title: The importance of Ayurveda increased in the world during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.