ग्रामस्थांना पटले महापालिकेचे महत्त्व

By Admin | Published: May 30, 2017 03:00 AM2017-05-30T03:00:18+5:302017-05-30T03:00:18+5:30

गेल्या २० वर्र्षांपूवी महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा काही प्रमाणात मिळत आहेत.

The importance of the Corporation to the villagers | ग्रामस्थांना पटले महापालिकेचे महत्त्व

ग्रामस्थांना पटले महापालिकेचे महत्त्व

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हडपसर : गेल्या २० वर्र्षांपूवी महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या गावातील नागरिकांना मूलभूत सुविधा काही प्रमाणात मिळत आहेत. हे पाहून महापालिकेतून वगळलेल्या गावांतील नागरिकांना त्याचा हेवा वाटणे स्वाभाविक आहे. त्यावेळी मात्र याच गावातील मंडळींनी महापालिकेत जाण्यासाठी विरोध केला होता. आता परिस्थिती बदलली आहे. महापालिकेचे महत्त्व नागरिकांना कळले आहे.
आजही सामाजिक दडपणामुळे गावकरी महापालिकेत जाण्यासाठी तयार आहेत, अशी कुजबूज सुरू आहे. महापालिकेत या गावांचा समावेश केल्यानंतर उरलीसुरली शेतीही नष्ट होऊन काँक्रिटचे जंगल उभे राहील, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. ग्रामपंचायतीचे रडगाणे आणि स्थानिक नेतेगिरी करणाऱ्यांचा आता वीट आला आहे, अशी भावना नागरिकांकडून बोलून दाखवली जात आहे. गावच्या विकासाचे नियोजन नाही. पंचायतराजमुळे गावचा विकास व्हायला पाहिजे. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून मिळणारा निधीतून गावचा विकास करणे शक्य आहे. मात्र तसे होत नाही.
ग्रामपंचायतीमध्ये १७-१८ जणांना ग्रामपंचायत सदस्यपदाचा मान मिळतो, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्येही सन्मान मिळतो. महापालिकेत गेल्यानंतर फक्त एक किंवा दोघांना नगरसेवकपदाची संधी मिळणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून किरकोळ तातडीने मार्गी लावता येणे सहज शक्य होत नाही. मात्र, तीच कामे महापालिकेच्या प्रशासनाकडूंन करून घेता येते.
केंद्र शासनाने आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी चांगले प्रकल्प साकारले जात आहेत. शिक्षणासाठी अनेक लाभदायी योजना आहेत. महापालिका हद्दीपासून पाच किलोमीटर अंतरापर्यंतच्या गावांना गरजेनुसार पिण्यासाठी पाणी दिले जात आहे. बांधकामासाठी जागा नसल्यामुळे बांधकाम व्यावसायिकांनी महापालिकालगतच्या गावाकडे आपला मोर्चा वळविला आहे. त्यामुळे उपनगरालगतच्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये मोठमोठे गृहप्रकल्प उभे राहत असल्याने ग्रामपंचायतीचा कारभार वाढत आहे, मात्र त्यांना सुविधा पुरविता येत नाहीत. स्थानिकांची दादागिरी वाढली. बाहेरील नागरिक स्थायिक झाले आहेत, त्याना येथील स्थानिकांचा फार त्रास होत आहे, पालिकेत समाविष्ट करण्याऐवजी काहींनी स्वतंत्र महापालिका व्हावी, अशी मागणी केली आहे.

पालिका हद्दीत एक गुंठा जागा खरेदीला रितसर मान्यता आहे. यामुळे शहरालगतच्या गावांचा समावेश पालिकेत झाल्यास नव्याने खरेदी होणाऱ्या गुंठेवारीला शासकीय मान्यतेची मोहर आपोआपच लागू शकेल.
- तेजस हरपळे, बांधकाम व्यावसायिक

पालिकेत गावे समाविष्ट झाल्याने सुविधा कमी मिळाल्या, पण पालिकेच्या नियमावलीमुळे अनधिकृत बांधकामांवर निर्बंध आले आहेत.
- रूपेश पिसाळ, मुंढवा

स्थानिक लोकांचा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आमच्यासारख्या लोकांना त्रास होतो. कोणतेही काम स्थानिक आहे की बाहेरचा, हे पाहूनच केली जातात, त्यामुळे पालिका प्रशासन चांगले वाटते.
- रवींद्र कांबळे, भेकराईनगर


गावे समाविष्ट झाल्यास नव्या महापालिका स्थापनेचे वारे वेगाने वाहू लागणार, हे निश्चित झाले आहे. पूर्वी समाविष्ट केलेल्या गावांना काही प्रमाणात मूलभूत सुविधा मिळाल्या आहेत.
- सागर रासकर, वाडाचीवाडी

Web Title: The importance of the Corporation to the villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.