डायरीचे महत्त्व कायम
By Admin | Published: December 23, 2016 12:34 AM2016-12-23T00:34:04+5:302016-12-23T00:34:04+5:30
आजच्या आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध प्रकारच्या डायऱ्या
नेहरूनगर : आजच्या आधुनिक डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम असून, नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध प्रकारच्या डायऱ्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
नवीन वर्ष अवघ्या आठ दिवसांवर आल्यामुळे वर्षभराच्या नियोजनासाठी लागणाऱ्या २०१७च्या नवीन वर्षाच्या डायऱ्या बाजारपेठेत दाखल झाल्या असून, आजच्या आधुनिक युगात संगणक, मोबाइल, टॅब, लपटॉप ही माहिती साठवण्यासाठी असलेली आधुनिक यंत्रे उपलब्ध आहेत. रोजच्या नियोजन व दैनंदिन व्यवहाराचे नोंद ठेवण्यासाठी डायरीचा उपयोग करीत असल्यामुळे आजच्या डिजिटल युगातही डायरीचे महत्त्व कायम आहे.
सध्या बाजारपेठेत २०१७करिता नवीन वर्षाच्या डायऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्या असून, त्यामध्ये विविध प्रकार आहेत. आॅर्गनायजर, एक्झिक्युटिव्ह डायरी, प्लॅनर, नोटबुक, इंजिनिअरिंग डायरी, न्यू इयर डायरी, पॉकेट डायरी, टेलिफोन डायरी आदी प्रकारच्या डायऱ्या विक्रीसाठी उपलब्ध असून, १० रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत डायऱ्या बाजारपेठेत आहेत.
डायऱ्यांमध्ये अनेक व्यक्तींची केलेल्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. छायाचित्र व त्यांनी केलेल्या कार्याची माहितीदेखील आहे. याच बरोबर ‘थिंग ओर्गोनिक’ या डायरीमध्ये सामाजिक व पर्यावरणविषयक सामाजिक संदेश देण्यात आले आहेत.
तर वाह्य या डायरीमध्ये विविध सामाजिक संदेश देण्यात आले असून, लाच देणे गुन्हा आहे. तरी आपण लाच देऊन भ्रष्टाचारास का वाव देत आहोत? स्त्रीभ्रूणहत्येमुळे दिवसेंदिवस मुलींच्या जन्माचे
प्रमाण घटत आहे. आम्हाला माहीत आहे, तरी आपण मुलींची हत्या का करीत आहोत. झाडे तोडून पर्यावरणाची हानी होत आहे....तरी आपण का झाडे तोडत आहोत? वीजचोरी हा एक सामाजिक गुन्हा असताना देखील आपण का वीजचोरी करीत आहोत, अशा प्रकारचे सामाजिक प्रश्न उपस्थित करून डायरीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.(वार्ताहर)