समाज प्रबोधनातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवणे गरजेचे : कृष्ण प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:17 AM2021-02-17T04:17:10+5:302021-02-17T04:17:10+5:30
तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागाने ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत वाहतूक जनजागृती ...
तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय वाहतूक विभागाने ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत वाहतूक जनजागृती दिंडीचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाचे श्रीकांत डीसले, अरुण आदे, माजी नगराध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक डी. डी. भोसले, सचिव अजित वडगावकर, प्रकाश काळे, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, अभिनेत्री श्वेता परदेशी, आळंदी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे आदींसह पोलिस अधिकारी, कर्मचारी व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, ज्ञानेश्वर विद्यालय आणि शरदचंद्र पवार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी जनजागृतीपर दिंडी काढली. या दिंडीत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्वतः बैलगाडीतून शहरात प्रदक्षिणा पूर्ण केली. वाहतूक विभागाने रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे श्रीकांत डिसले यांनी केले, तर सूत्रसंचालन सूर्यकांत मुंगसे यांनी केले.
--
कोट
" दुचाकी वाहन चालवताना सुरक्षेच्या दृष्टीने हेल्मेट घालणे गरजेचे आहे. तर चारचाकी वाहन चालवताना सीटबेल्ट लावणे आवश्यक आहे. कारण प्रवासात एक चुक दुर्घटनेला आमंत्रण असुिि शकते. नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.
- कृष्ण प्रकाश, पोलीस आयुक्त.
--
फोटो १६शेलपंिपळगाव वाहतूक सुरक्षा
-- फोटो ओळ : तीर्थक्षेत्र आळंदीत रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश.