MPSC चा महत्वाचा निर्णय! राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 08:18 PM2022-06-17T20:18:44+5:302022-06-17T20:18:51+5:30
येत्या २४ जूनपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार
पुणे : काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विविध स्पर्धा परीक्षांस बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न / संधी मर्यादित करण्याचा निर्णय रद्द केला. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ करीता अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या २४ जूनपर्यंत या परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे.
आयोगाच्या परीक्षेच्या संधीसंदर्भातील तरतुदीमुळे बऱ्याचशा उमेदवारांनी या परीक्षेचा अर्ज केला नसल्याची शक्यता होती. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनाही ही परीक्षा देता यावी यासाठी आयोगाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
परीक्षेसाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचा व अंतिम दिनांक २४ जून २०२२ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत आहे. जाहिरातीमधील इतर अटी व शर्तीमध्ये कोणताही बदल नाही.
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करीता अर्ज सादर करण्यास दिनांक 24 जून 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आहे. यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. pic.twitter.com/J4N1hZq9RY
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) June 17, 2022