पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीबाबत महत्त्वाचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:11 AM2021-05-27T04:11:43+5:302021-05-27T04:11:43+5:30

चाचणीबाबत महत्त्वाचा निर्णय आता शारीरिक चाचणी गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी मोजणार नाहीत प्रशांत ननवरे बारामती: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ...

Important decision regarding physical examination for the post of Sub-Inspector of Police | पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीबाबत महत्त्वाचा निर्णय

पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीबाबत महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

चाचणीबाबत महत्त्वाचा निर्णय

आता शारीरिक चाचणी गुण अंतिम

गुणवत्ता यादीसाठी मोजणार नाहीत

प्रशांत ननवरे

बारामती: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दि. २५ मे २०२१ रोजी पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीसंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता शारीरिक चाचणीचे गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी मोजले जाणार नाहीत. याबाबत विद्यार्थ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

२५ मे २०२१ राज्य शासनाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. लोकसेवा आयोगाने पोलीस उपनिरीक्षक पदासाठीच्या शारीरिक मानकांमधील बदलांबाबतचे एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार मैदानी परीक्षेचे गुण यापुढे केवळ मुलाखतीच्या पात्रतेसाठी गृहीत धरले जाणार आहेत. ते गुण अंतिम गुणवत्ता यादीसाठी मोजले जाणार नाहीत.

त्यामुळे वर्षानुवर्ष मैदानी चाचणीचा सराव करणारे विद्यार्थी संभ्रमात सापडले आहेत. याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. मैदानी चाचणीत १०० पैकी फक्त ६० गुण प्राप्त करणारा कोणताही उमेदवार मुलाखतीला पात्र ठरणार आहे. खरे तर मैदानी चाचणीचे स्वरूप पाहता ६० गुण कोणताही विशेष सराव न करता उमेदवार सहज प्राप्त करेल. मैदानीचे महत्त्व पूर्णत: संपुष्टात आणणारा हा निर्णय महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी खूप अन्यायकारक असल्याची भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त होत आहे. मुळातच याबाबत कोणत्याही संघटनेने किंवा विद्यार्थ्यांनी कोणतीही मागणी केली नव्हती.त्यानंतर देखील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांवर हा नवीन बदल का लादला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील युवक शारीरीक चाचणीत अव्वल गुण मिळवून या पदाला गवसणी घालत होते. आता मैदानी चाचणीत निपुण असणाऱ्या या वर्गासमोर अंधार निर्माण झाला आहे.

येथील सह्याद्री करिअर अ‍ॅकॅडमीचे प्रमुख उमेश रुपनवर यांनी ‘लोकमत’शी बोलताना अधिक माहिती दिली. त्यानुसार मुळात पोलीस उपनिरीक्षक हे पद जनतेमध्ये मिसळून, जनतेच्या समस्या जाणून घेणारे, प्रसंगी गुन्हेगारांशी दोन हात करणारे आहे. त्यामुळे या पदासाठी बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमताही तितकीच महत्त्वाची आहे. वेगवेगळे मोर्चे, आंदोलने, गुन्हेगारी टोळ्या, दंगे हे हाताळण्यासाठी १२—१२ तास प्रसंगी २४ तास काम करणाऱ्या पोलिसांची शारीरिक क्षमता टिकून राहील का ,याबाबत गांभीर्याने विचार होण्याची गरज आहे.

...पोलिसातील सिंघम

नामशेष होण्याची भीती

पोलीस भरतीसाठी शासनाने यापूर्वी १०० गुणांची चाचणी ५० गुणांवर आणत मैदानाचे महत्त्व कमी केले आहे. त्यापाठोपाठ पोलीस उपनिरीक्षकपदाच्या बाबत मैदानी चाचणीची किंमत झीरोवर आणण्यात आली आहे. पोलीस खात्यात मैदान गाजविणाऱ्या खंबीर सिंघम पोलीस अधिकाऱ्यांची गरज वेगवेगळ्या गंभीर प्रसंगात अधोरेखित होते.पोलीस खात्यात ‘फिजिकल फिटनेस’ला अनन्य साधारण महत्त्व होते.मात्र,या निर्णयामुळे पोलीस खात्यातील सिंघम नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

Web Title: Important decision regarding physical examination for the post of Sub-Inspector of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.