पिंपरीतील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी: दापोडीत पाणी पुरवठा बंद राहणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 10:34 PM2024-07-29T22:34:29+5:302024-07-29T22:34:51+5:30
नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क , पिंपरी : पिंपळे गुरव ते दापोडीला जोडणाऱ्या पुलावरील पाईपलाईनचे कामकाज करण्यात येणार आहे. येत्या ३१ जुलैला दापोडी गावाचा पाणीपुरवठा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत बंद राहणार आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे यांनी दिली आहे.
पिंपरी- चिंचवड महापालिका हद्दीतील पिंपळे गुरव ते दापोडीला जोडणाऱ्या पुलावरील ग्रॅव्हीटी पाईपलाईनचे पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक कामकाज करणे गरजेचे होते. त्यामुळे २५ जुलै रोजी दापोडी गावाकरीता शटडाऊन घेतला होता. त्यानतंर जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पुणे यांच्या आदेशानुसार तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पुर्व सुचनेनुसार दि.२४ व २५ जुलै रोजी पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला होता. त्यामुळे शटडाऊन स्थगित केला होता. त्यामुळे हे कामकाज करण्यासाठी बुधवारी दापोडी गावाचा पाणीपुरवठा सकाळी १० ते रात्री १० पर्यंत बंद राहणार आहे.
दुरुस्तीच्या कामासाठी मौजे दापोडी परीसरातील सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दापोडीमधील सर्व भागात दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवार १ ऑगस्ट रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल. तरी नागरिकांनी महापालिकेकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन केले आहे.
भारतीय हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे मागील आठवड्यातील शट डाऊन मागे घेतला होता. मात्र तो रद्द केला होता. दुरुस्तीच्या कामासाठी मौजे दापोडी परीसरातील सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे दापोडीमधील सर्व भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार १ ऑगस्टला होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होणार आहे.