पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:41 AM2023-02-14T10:41:57+5:302023-02-14T10:42:51+5:30

शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येत आहेत...

Important news for Pune residents city's water supply will be shut off for two days | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहराचा पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

googlenewsNext

पुणे : महापालिकेकडून समान पाणी योजनेंतर्गत पाण्याचे ऑडिट करण्यासाठी शहरातील मुख्य जलवाहिन्यांवर फ्लो मीटर बसविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत बुधवारी (दि. १५) आणि गुरुवारी शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणी बंद असलेल्या भागातील पुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळी आणि उशिराने होणार असून, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

बुधवारी पाणी बंद

- सणस पंपिंग स्टेशन : नऱ्हे, धायरी मानस परिसर, धायरी खंडोबा मंदिर परिसर गल्ली नं. बी १० ते बी-१४

गुरुवारी पाणी बंद

- चतुश्रुंगी टाकी परिसर : बोपोडी, अनगळ पार्क, खडकी, सहारा हॉटेल, राजभवन, पंचवटी, औंध, खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी, अभिमानश्री सोसायटी, एसएनडीटी टाकी परिसर - शिवाजीनगर, भोसलेनगर, घाेले रोड, सेनापती बापट रोड, हनुमाननगर, जनवाडी, वैदुवाडी, मॉडेल कॉलनी, वडारवाडी, रेव्हेन्यू कॉलनी, पोलिस लाइन, गोखलेनगर, भांडारकर रोड आणि परिसर पद्मावती टाकी परिसर - बिबवेवाडी, अप्पर व सुपर इंदिरानगर, संभाजीनगर, काशीनाथ पाटीलनगर, लोअर इंदिरानगर, चिंतामणीनगर, स्टेट बॅंकनगर लेक टाउन, गंगाधाम, बिबवेवाडी, कोंढवा रस्ता, विद्यासागर कॉलनी, सॅलिसबरी पार्क, महर्षीनगर, डायस प्लॉट, मार्केट यार्ड, धनकवडी, गुलाबनगर, चैतन्यनगर, तळजाई वसाहत परिसर. नवीन कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्र - ससाणेनगर, काळे बोराटेनगर, हडपसर गावठाण, ग्लायडिंग सेंटर, फुरसुंगी, सय्यदनगर, सातववाडी, इंद्रप्रस्थ, मगरपट्टा, वानवडी, चंदननगर, खराडी, रामटेकडी, माळवाडी, भोसले गार्डन, १५ नंबर आकाशवाणी, लक्ष्मी कॉलनी, महादेवनगर, मगरपट्टा परिसर.

Web Title: Important news for Pune residents city's water supply will be shut off for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.