पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 10:30 AM2022-09-20T10:30:39+5:302022-09-20T10:32:57+5:30

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची माहिती...

Important news for Pune residents Water supply in 'this' area of the city stopped on Thursday | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागातील पाणीपुरवठा बंद

Next

पुणे : पर्वती जलकेंद्राच्या विविध पाणी टाक्यांचे व चिखली पंपिंग स्टेशन येथील पंपिंग व स्थापत्य विषयक काम करण्यात येणार असल्याने गुरुवारी (दि. २२) शहरातील सर्व पेठांसह डेक्कन, शिवाजीनगर परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग

पर्वती एमएलआर टाकी परिसर : गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ आदी.

पर्वती एचएलआर टाकी परिसर : सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २, लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायर प्लॉट ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गिरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, भाग्योदयनगर, शिवनेरीनगर, मिठानगर, कुमार पृथ्वी, स. नं. ४२ कोंढवा खुर्द, साईबाबानगर आदी.

पर्वती एलएलआर परिसर : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर.

चिखली पंपिंगवर अवलंबून असणारा भाग : संजय पार्क, बर्माशिल सोसायटी, पुणे एअरपोर्ट, राजीव गांधी नगर नॉर्थ व साऊथ, यमुनानगर, गणेशनगर (बोपखेल), कळस काही भाग, म्हस्के वस्ती, टिंगरेनगर गल्ली नं. १ ते ६, एकतानगर झोपडपट्टी, सिद्धेश्वर कुमार समृद्धी, श्री पार्क सोसायटी, पराशर सोसायटी, ठुबे पठारे वस्ती, दिनकर पठारे वस्ती इत्यादी.

Web Title: Important news for Pune residents Water supply in 'this' area of the city stopped on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.