पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा बंद

By निलेश राऊत | Published: December 18, 2023 01:57 PM2023-12-18T13:57:19+5:302023-12-18T13:58:59+5:30

तसेच शुक्रवारी ( दि. २२ डिसेंबर ) रोजी या भागात सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे....

Important news for Pune residents! Water supply to area of the city shut down on Thursday | पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा बंद

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गुरुवारी शहरातील 'या' भागाचा पाणीपुरवठा बंद

पुणे : पर्वतीसह लष्कर, वारजे, चांदणी चौक व आदी जलकेंद्र, पाणी टाकी परिसर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामासाठी येत्या गुरुवारी ( दि. २२ डिसेंबर ) रोजी शहराच्या मध्यवर्ती भागासह पर्वती, हडपसर भागातील पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी ( दि. २२ डिसेंबर ) रोजी या भागात सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने याबाबत माहिती दिली. पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत पर्वती एम एल आर टाकी परिसर, पर्वती एच एल आर टाकी परिसर, व पर्वती एल एल आर टाकी परिसर, लष्कर जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जलकेंद्र, वारजे जलकेंद्र व त्या अखत्यारीतील चांदणी चौक टाकी परिसर, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएससार टाकी परिसर, वारजे जलकेंद्र लगत जीएसआर टाकी परिसर, वारजे माळवाडी व रामनगर परिसर व चतुश्रुगी टाकी परिसर, वडगाव जलकेंद्र परीसर येथील विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी करण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग-

पर्वती एम एल आर टाकी परिसर :- गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहिया नगर, सोमवार पेठ, अरुण वैद्य स्टेडीयम परिसर, घोरपडे पेठ इ.

पर्वती एच एल आर टाकी परिसर सहकार नगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणी नगर भाग-१ व २ लेक टाऊन, शिवतेजनगर, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर डायस प्लॉट, ढोलेमळा, सॅलेसबरी पार्क, गरीधरभवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, सेमिनरी झोन वरील मिठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, सर्व्हे नं ४२,४६ (कोंढवा खुर्द) इत्यादी परीसर, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र,, पर्वती दर्शन, तळजाई, कात्रज परीसर, धनकवडी परीसर, इत्यादी.

पर्वती एल एल आर परिसर शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परीसर, रोहन कृतिका व लगतचा परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजी नगर परिसर, स्वारगेट परिसर,

लष्कर जलकेंद्र अंतर्गत पाणी पुरवठा बंद असणारा भाग संपूर्ण हडपसर परिसर, सातववाडी, गोंधळेनगर, ससाणे नगर, काळे पडळ, बी.टी-कवडे रोड, भीमनगर, कोरेगाव पार्क, रामटेकडी इंडस्ट्रीयल एरिया, वानवडी, जगताप चौक परिसर, जांभूळकर मळा, काळेपडळ, हंडेवाडी रोड, महमदवाडी गाव, कोंढवा खुर्द, कोंढवा गावठाण, मिठानगर, भाग्योदय नगर, लुल्लानगर, संपूर्ण पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड, केशवनगर, साडेसतरा नळी, फुरसुंगी, उरुळी देवाची, मांजरी बु, शेवाळवाडी, खराडी, वडगाव शेरी (पार्ट), संपूर्ण ताडीवाला रोड, मंगळवार पेठ, मालधक्का रोड, येरवडा गाव, एनआयबीएम रोड, रेसकोर्स, इत्यादी लष्कर जलकेंद्राच्या अखत्यारीत येणारे संपूर्ण परिसर.

Web Title: Important news for Pune residents! Water supply to area of the city shut down on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.