पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणीकपात तूर्तास टळली, २ महिन्यांसाठी ७ टीएमसी पाणी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:21 AM2023-04-19T11:21:43+5:302023-04-19T11:21:52+5:30

पुणे महापालिकेने पाण्याचा वापर जपून करावा, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्या आहेत

Important news for Punekar! Water shortage averted for now, 7 TMC of water required for 2 months | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणीकपात तूर्तास टळली, २ महिन्यांसाठी ७ टीएमसी पाणी लागणार

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! पाणीकपात तूर्तास टळली, २ महिन्यांसाठी ७ टीएमसी पाणी लागणार

googlenewsNext

पुणे : जलसंपदा विभाग व महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी झालेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारच्या पाणीकपातीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुणेकरांवरील पाणीकपात तूर्तास टळली असली, तरी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हाेणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पाणीकपातीसंदर्भात निर्णय हाेण्याची शक्यता आहे.

खडकवासला धरण साखळीत आजमितीला १२ टीएमसी पाणीसाठा आहे. या धरणांमधून शेतीकरिता उन्हाळी आवर्तन देण्यासाठी साधारणत: ५ टीएमसी पाण्याची गरज आहे. पुणे शहराची तहान भागविण्यासाठी पुढील दोन महिन्यांसाठी साधारणत: ७ टीएमसी पाण्याची गरज भासणार आहे. दरम्यान, उन्हाळ्यात पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात हाेत असल्याने अंदाजे दोन टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याचा वापर जपून करावा, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला दिल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

जलवाहिनी दुरुस्तीचे काम ऑक्टोबर महिन्यानंतर

खडकवासला ते पर्वती जलकेंद्रापर्यंत महापालिकेच्या वतीने २५ वर्षांपूर्वी बारा किलोमीटर अंतराची बंद जलवाहिनी टाकण्यात आली होती. या जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गंज चढला असून, तिची काही ठिकाणी दुरुस्तीही करणे आवश्यक आहे. याकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली; परंतु या निविदा प्रक्रियेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. आजमितीला कालव्यातून पाणी साेडण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतल्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हे ऑक्टोबर महिन्यानंतर करण्यात यावे, अशा सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केल्या आहेत.

नवीन नळजोड देणे बंद

पाण्याची उपलब्धता आणि वाढते उन्ह लक्षात घेता पाण्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी बांधकाम, वाहने धुण्यासाठी पिण्याचा पाण्याचा वापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बांधकामासाठी व वॉशिंग सेंटरवर पिण्याचा पाण्याचा वापर करण्याऐवजी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी महापालिकेने उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांचे नळजोड कापले जाणार आहेत. दरम्यान, पुढील दीड महिन्याच्या काळात नवे नळजोड दिले जाणार नसल्याचे अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले आहे.

Web Title: Important news for Punekar! Water shortage averted for now, 7 TMC of water required for 2 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.