विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! बीई, बी.टेकसह इतर कोर्सेसच्या प्रवेश प्रक्रियेची तारीख आली
By प्रशांत बिडवे | Published: July 5, 2024 11:03 AM2024-07-05T11:03:56+5:302024-07-05T11:04:19+5:30
सीईटी सेलतर्फे विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीने कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीचे आयोजन केले होते...
पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध अभ्यासक्रमासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यासाठीच्या तारखा गुरुवारी दि. ४ जुलै रोजी प्रसिद्ध केल्या. त्यानुसार बीई, बीटेक आणि एलएलबी ३ वर्षे पदवीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया येत्या दि. १० जुलै पासून सुरू होणार आहे.
सीईटी सेलतर्फे विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी केंद्रीय पद्धतीने कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी सामायिक प्रवेश परीक्षा सीईटीचे आयोजन केले होते. तसेच मागील एक महिन्यात सीईटीचे निकाल जाहीर केले आहेत.
एमसीए: दि.६ जुलै, एमबीए/ एमएमएस, एमई आणि एम.टेक आणि एम आर्च. : दि.९ जुलै पासून प्रवेश सुरू होतील. तर एलएलबी (५ वर्षे), बीए.बीएसस्सी बीएड, एम.एड: दि.८ जुलै, बी.फार्म/ फार्म डी., बी. हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी, बी.पीएड एम.पीएड : दि. ११ जुलै रोजी प्रक्रिया सुरू होणार आहेत.
बी. डिझाईन, बीएड, एमएड: दि. १२ जुलै, एम.फार्म, एम.एचएमसीटी : दि.१३ जुलै आणि अभियांत्रिकी आणि फार्मसी थेट द्वितीय वर्षे प्रवेश प्रक्रियेला दि. १६ जुलै रोजी सुरुवात होणार असल्याचे सीईटी सेल तर्फे स्पष्ट करण्यात आले.