PUNE | रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दैनंदिन एक्स्प्रेस गाड्यांची सेवा पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 11:11 AM2022-06-30T11:11:21+5:302022-06-30T11:12:05+5:30
महत्त्वाच्या दोन गाड्या पुन्हा ट्रॅकवर...
पुणे : मध्य रेल्वेतर्फेपुणे-भुसावळ आणि सोलापूर-गदग या दैनंदिन एक्स्प्रेस गाड्यांची सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. पुणे-भुसावळ (११०२६) ही एक्स्प्रेस १० जुलैपासून दररोज सकाळी ११ वाजून ४० मिनिटांनी पुण्यातून सुटणार असून, भुसावळ येथे रात्री दहा वाजता पोहोचेल. भुसावळ-पुणे (११०२५) एक्स्प्रेस ही ११ जुलैपासून मध्यरात्री साडेबारा वाजता सुटेल आणि दुपारी बारा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहोचेल. दरम्यान, ही रेल्वे चिंचवड, लोणावळा, कर्जत, पनवेल, कल्याण, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, चाळीसगाव, काजगाव (फक्त ११०२५ साठी), पाचोरा आणि जळगाव या स्थानकांवर थांबेल.
तर सोलापूर-गदग (११३०५) ही एक्स्प्रेस १५ जुलैपासून दररोज सकाळी सोलापूरहून ११ वाजून ५० मिनिटांनी सुटेल आणि गदग येथे संध्याकाळी पाच वाजता पोहोचेल. गदग-सोलापूर (११३०६) ही एक्स्प्रेस १६ जुलैपासून दररोज मध्यरात्री दीड वाजता निघेल आणि सोलापूर येथे सकाळी सव्वादहा वाजता पोहोचेल. दरम्यान, ही रेल्वे टिकेकरवाडी, होटगी, आहेरवाडी (फक्त ११३०५ साठी), सुलेरजवळगी, तडवळ, पडणूर, लच्याण, इंडी रोड, चोरगी, निंबाळ, क्यातनकेरी रोड (फक्त ११३०५ साठी), मिंचनाळ, विजयपुरा, इब्राहिमपूर, जुमनाल, होनगन हळ्ळी, मुलवाड, कलगुर्की (फक्त ११३०५ साठी), कुडगी (फक्त ११३०५ साठी), बसवन बागेवाडी रोड, अंगदगेरी हॉल्ट (फक्त ११३०५ साठी), वंदाल, बेनाल, आलमट्टी, कुडल संगम रोड, सीतीमनी (फक्त ११३०५ साठी), जड्रामकुंटी, कडलीमट्टी (फक्त ११३०५ साठी), मुगलल्ली, बागलकोट, गुळेदगुड्ड रोड, बदामी, लखमापूर, होळे आलूर, मल्लापूर, बळगानूर आणि होंबल या स्थानकांवर थांबेल.