चिंकारा शिकारप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे हाती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:13 AM2021-09-22T04:13:05+5:302021-09-22T04:13:05+5:30
कडबनवाडी अभयवन याठिकाणी शनिवारी सकाळी भल्या पहाटे आलिशान टाटा हैरीहर गाडी १४ सिरीयल पासिंग आल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले होते. ...
कडबनवाडी अभयवन याठिकाणी शनिवारी सकाळी भल्या पहाटे आलिशान टाटा हैरीहर गाडी १४ सिरीयल पासिंग आल्याचे प्रत्यक्षदर्शी लोकांनी सांगितले होते. यामध्ये तीन अज्ञात व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे या ठिकाणी जवळ असणाऱ्या शेतकऱ्यांच्या सीसीटीव्ही फुटेजवरून गाडीचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत तीन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तालुका अधिकारी सूर्यवंशी यांनी सांगितले की, तपास प्रगतिपथावर आहे. यामध्ये काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवरील सूचनांनुसार सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणाचा छडा लागेल असा विश्वास व्यक्त केला. या प्रकरणी तपास सीआयडीकडे सोपवण्यात यावा, अशी स्थानिकांनी मागणी केली होती. तसेच या घटनेचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून याठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली होती. याठिकाणी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणामुळे या परिसरात भीती निर्माण झाली असून, आरोपींचा छडा लावण्याची मागणी होत आहे.