पुण्याचा पाणीवापर नियंत्रित करणे अशक्य : पाटबंधारे मंडळाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2019 01:22 PM2019-12-17T13:22:26+5:302019-12-17T13:24:51+5:30

खडकवासला प्रकल्प साखळीतील चारही धरणांतून ३३.७७ टीएमसी पाणीवापरासाठी मंजूर

Impossible to control Pune's water use | पुण्याचा पाणीवापर नियंत्रित करणे अशक्य : पाटबंधारे मंडळाचे स्पष्टीकरण

पुण्याचा पाणीवापर नियंत्रित करणे अशक्य : पाटबंधारे मंडळाचे स्पष्टीकरण

Next
ठळक मुद्देसमन्यायी पाणीवाटपाच्या आदेशाचे पालन करण्याचे आव्हानपाटबंधारे मंडळाचे स्पष्टीकरण जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश देऊनही पाणी उपसा यंत्रणा उगम ते अंतिम ठिकाण यानुसार मंजूर कोटा देण्याचा आदेश

पुणे : जनाई-शिरसाई योजनेअंतर्गत बारामती, पुरंदर व दौंड या तालुक्यांना उपलब्ध पाण्यातून समन्यायी पद्धतीने पाणी देण्याचा आदेश जलसंपदा विभागाचे प्राथमिक विवाद निवारण अधिकारी वि. गि. रजपूत यांनी दिला आहे. जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने आदेश देऊनही पाणी उपसा यंत्रणा महापालिकेने जलसंपदा विभागाच्या ताब्यात दिली नाही. महापालिकेच्या जवळपास पावणेएकोणीस टीएमसी पाणीवापरावर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याची बाजू पुणे पाटबंधारे मंडळाने मांडली आहे. त्यामुळे या निर्णयाच्या अंमलबजावणीचे आव्हान मंडळासमोर आहे. 
जनाई-शिरसाई योजनेला समन्यायी पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी बारामतीतील शेतकरी विठ्ठल जराड यांनी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तथा प्राथमिक विवाद निवारण अधिकाºयांकडे दावा दाखल केला होता. 
जनाई-शिरसाई योजनेसाठी मंजूर असलेले ३.६० टीएमसी पाणी हंगामनिहाय मिळावे,  शिर्सुफळ तलावात ‘उगम ते अंतिम ठिकाण’ या तत्त्वानुसार पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यात दोन्ही बाजूंचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर प्राथमिक विवाद निवारण अधिकाºयांनी शेतकºयांचे म्हणणे ग्राह्य धरत पाणी सोडण्याची मागणी केली. 
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पीय तरतुदी व पाणी उपलब्धतेनुसार पाणी कोटा मंजूर करून त्यानुसार पाणीवाटप करण्यात यावे. तसेच, उगम ते अंतिम ठिकाण यानुसार मंजूर कोटा देण्याचा आदेश दिला आहे.
खडकवासला प्रकल्प साखळीतील चारही धरणांतून ३३.७७ टीएमसी (प्रकल्पीय साठा) पाणीवापरासाठी मंजूर आहे. खडकवासला धरणातून पुणे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी ११.५० टीएमसी पाणी मंजूर आहे. आकस्मिक पाणी निश्चिती समितीच्या बैठका १५ ऑक्टोबर पूर्वी होत नसल्याने आणि आरक्षण निश्चितीकरण होत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा वापर बिगर सिंचनासाठी करावा लागतो.
शहराला साडेअकरा टीएमसी मंजूर पाणी असूनही महापालिकेने २०१७-१८मधे १८.७१ टीएमसी पाणीवापर केला. पाणीउपसा ठिकाणे आणि त्याची साधनसामग्री महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशानंतरही महापालिकेने जलसंपदा विभागाकडे दिलेली नाहीत. त्यामुळे महापालिकेचा पाणीवापर नियंत्रित करणे शक्य होत नसल्याची भूमिका पाटबंधारे विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी मांडली आहे. 
.....
अपूर्ण बांधकामामुळे अडचणी
जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेतील कालव्याची जागा अनेक ठिकाणी मुरमाड आहे, तसेच काही ठिकाणी खोल खोदाईतून (डीप कट) पाणी जाते. त्यामुळे पाणी पुढे सरकण्यात अडचण येते. ही योजना अजूनही पूर्ण झालेली नाही. अनेक ठिकाणचे काम अपूर्ण असल्याने सिंचनाची अंमलबजावणी करता येत नसल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले. 
.........
ही माहिती देण्याचे पाटबंधारे मंडळाला आदेश
खडकवासल्यापासून अंतिम टोकापर्यंत हंगामनिहाय होणारा पाणी वापर आणि गळतीची आकडेवारी द्यावी
वरवंड व शिर्सुफळ तलावातील पाण्याचा ग्राहकनिहाय (शेतकरी, बिगरसिंचन व पिण्याचे पाणी) हिशेब द्यावा. 
६५ तलाव भरून देण्याबाबत जनाई-शिरसाई योजनेची माहिती सादर करा.
कुरकुंभ पाणी आरक्षण आणि जनाई-शिरसाईतील अडचणींची माहिती द्यावी.

Web Title: Impossible to control Pune's water use

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.