नपुंसक असताना केले लग्न आणि कृत्रिम अवयव वापरून पत्नीवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 09:37 PM2019-08-29T21:37:49+5:302019-08-29T21:48:15+5:30
मुलगा नपुंसक असतानाही घरच्यांनी लग्न करून दिले. त्यानंतर कृत्रीम अवयव वापरून त्याने पत्नीशी अनैसर्गिक पध्दतीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ करून माहेरून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी मारहाण करून विवाहितेचा छळ केला.
पिंपरी : मुलगा नपुंसक असतानाही घरच्यांनी लग्न करून दिले. त्यानंतर कृत्रीम अवयव वापरून त्याने पत्नीशी अनैसर्गिक पध्दतीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ करून माहेरून पाच लाख रुपये घेऊन येण्यासाठी मारहाण करून विवाहितेचा छळ केला. २१ ते ३० मे २०१९ दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पती, सासू, चुलत सासू व चुलत सासऱ्यांच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी भोसरी येथील २८ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पीडित महिलेचा पती आणि सासरचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील आहेत. मुलगा नपुंसक असल्याचे माहीत असतानाही फिर्यादी महिलेच्या सासू, चुलत सासू व सासरे यांनी त्याचे लग्न फिर्यादी महिलेशी लावून दिले. त्यानंतर त्याने कृत्रीम अवयव वापरून महिलेशी अनैसर्गिक पध्दतीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ करून मारहाण केली. लग्नात खर्च झालेल्या रकमेच्या बदल्यात माहेरून पाच लाख रुपये घेऊन ये, असे विवाहितेस सांगितले. याप्रकरणी पीडितेने फिर्याद दिल्यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, औरंगाबाद तालुक्यातील कन्नड पोलीस ठाण्याकडे हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.