विद्यार्थी साहाय्यक समितीच्या वेगळ्या कामाचा ठसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 AM2021-08-19T04:12:52+5:302021-08-19T04:12:52+5:30
पुणे : “मला काय त्याचे? यापेक्षा मलाच त्याचे या भावनेने काम होत असेल तर खऱ्या अर्थाने स्वराज्याचे सुराज्य होईल. ...
पुणे : “मला काय त्याचे? यापेक्षा मलाच त्याचे या भावनेने काम होत असेल तर खऱ्या अर्थाने स्वराज्याचे सुराज्य होईल. विद्यार्थी साहाय्यक समितीसाठी काम करणारे सर्व जण या विचाराने काम करतात म्हणून या संस्थेचे वेगळेपण आहे. समाज, देश घडायचा असेल तर अशा विचारांच्या लोकांची संख्या वाढली पाहिजे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी येथे जे उपक्रम राबवले जातात ते संस्थेचे वेगळेपण आहे. म्हणूनच येथील माजी विद्यार्थ्यांना परत संस्थेकडे यावे वाटते, ही गोष्टही या कामाची पावती आहे,” असे मत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन म्हणाल्या.
समितीच्या डॉ. अ. शं. आपटे वसतिगृहातील नूतनीकरण कामाचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश अकोलकर यांच्या विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास संकल्पना या पुस्तकाचे प्रकाशन कॅप्टन चंद्रशेखर चितळे यांच्या हस्ते झाले. समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड आदी या वेळी उपस्थित होते.