आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

By नम्रता फडणीस | Published: October 6, 2023 06:46 PM2023-10-06T18:46:21+5:302023-10-06T18:48:29+5:30

खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला....

Imprisonment of the accused for an unlimited period is a violation of fundamental rights | आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

आरोपीला अमर्यादित काळ कारागृहात ठेवणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन

googlenewsNext

पुणे : खटला निकाली काढायला वेळ लागणार असल्यास अमर्यादित काळासाठी आरोपीला कारागृहात ठेवणे हे त्याच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. खटला प्रलंबित असताना आरोपीला अनिश्‍चित काळासाठी तुरुंगात ठेवणे योग्य नाही, असे नमूद करून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी दुहेरी खुनाचा आरोप असलेल्या आरोपीला जामीन मंजूर केला.

आकाश सतीश चंडालिया असे त्याचे नाव आहे. दि. 25 सप्टेंबर 2015 रोजी त्याला लोणावळा पोलिसांनी अटक केली. अपहार करून खूनासह पुरावा नष्ट करणे, संगनमतासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल आहे. 14 डिसेंबर 2015 रोजी दोषारोपपत्र दाखल केले असून, तेव्हापासून तो कारागृहात आहे. आरोपीच्या बाजूने अँड. सना खान यांनी न्यायालयात बाजू मांडली. आरोपीवरील आरोपांचे गांभीर्य आणि त्याच्याविरोधातील खटला निकाली निघायला लागणाऱ्या प्रदीर्घ काळाचा विचार करता दोन्हींमध्ये समतोल राखण्याची आवश्‍यकता आहे. नजीकच्या काळात खटला निकाली निघण्याची चिन्हे नाहीत. अशा परिस्थितीत आरोपीला जामीन देण्याशिवाय पर्याय नाही, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

Web Title: Imprisonment of the accused for an unlimited period is a violation of fundamental rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.