माजी नगरसेवकाच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 07:49 PM2019-02-07T19:49:57+5:302019-02-07T19:53:21+5:30
पूर्व वैमनस्यातून चाकूच्या धाक दाखवून दोघांना दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या माजी नगरसेवक व त्यांच्या दोन मुलांसह चौघांना एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
पुणे : पूर्व वैमनस्यातून चाकूच्या धाक दाखवून दोघांना दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी करणाऱ्या माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांसह चौघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी भारत गायकवाड यांनी एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
तुषार तानाजी निम्हण (वय ३९), चेतन तानाजी निम्हण (वय ३१, दोघेही रा. १/१२, ताई आर्के ड, पाषाण), सुशांत बाळासाहेब निम्हण (वय २५, रा. आथर्वगंगा सोसायटी, पाषाण) आणि मुन्ना दिग्विजय निम्हण (वय २४, रा. घर नंबर २२०, सर्वे न. १ पाषाण) अशी शिक्षा झालेल्या चौघांची नावे आहेत.
२१ जुलै २०१५ रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास फिर्यादी आणि त्यांच्या मित्राने पाषाण येथील एका बेकरीतून काही वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर ते रिक्षातून जात असताना दुचाकीवर आलेल्या आरोपींनी मागील भांडणाच्या रागातून चाकूचा धाक दाखवून दांडक्याने मारहाण केली. त्यात फियार्दी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर रिक्षाची काचही फोडली. जखमींना जवळील रुग्णालयात नेण्यात आले होते. खटल्याचे कामकाज सरकारी वकील व्ही. व्ही. पाटील आणि ज्योती लक्का यांनी पाहिले. त्यांनी न्यायालयाने सरकारी पुरावे ग्राह्य धरून दंडाच्या रकमेपैकी प्रत्येकी ८ हजार रुपये आणि ४ हजार रुपये अनुक्रमे फियार्दी संजय तुकाराम जगताप आणि गणेश बबन सुपेकर यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
पिता-पुत्रांना यापूवीर्ही झाली होती शिक्षा
सत्र न्यायालयाचा बनावट जामीन आदेश तयार करून येरवडा तुरुंगातून खुनाच्या गुन्ह्यातील आपल्या मुलांना बाहेर काढल्याप्रकरणी माजी नगरसेवक तानाजी निम्हण आणि न्यायालयातील वरिष्ठ लिपिक दीपक राऊत यांना प्रत्येकी सहा वर्षे सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. तर तुषार व चेतन तानाजी निम्हण यांना प्रत्येकी एक वषार्ची र्ची सक्तमजुरी शिक्षा सुनाविन्यात आली आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये हा आदेश दिला होता.