महापालिका निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 07:24 AM2021-09-08T07:24:31+5:302021-09-08T07:25:00+5:30

शरद पवार यांचे मत; सर्वपक्षीयांना विश्वासात घ्या

Improper postponement of municipal elections pdc | महापालिका निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य

महापालिका निवडणुका पुढे ढकलणे अयोग्य

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी पुण्यात पवार बोलत होते. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

पुणे : निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे सर्व नियम पाळून निवडणुका घेण्याचे नियोजन केले आहे. महापालिका निवडणूक फेब्रुवारी २०२२मध्ये होणार आहे. सर्वपक्षीयांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे गरजेचे आहे. आता निवडणूक एक-दोन वर्षे पुढे ढकलणे योग्य वाटत नाही, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

मंगळवारी पुण्यात पवार बोलत होते. इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) आरक्षणावरून राज्य सरकारकडून मुंबई, पुणे, कोल्हापूरसह अन्य महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याचा दबाव निर्माण केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी भूमिका स्पष्ट केली.

“भारतात राहणाऱ्या हिंदू आणि मुस्लिमांचे पूर्वज एकच आहेत. हिंदू धर्माची ही व्याख्या ज्या कुठल्या पंथातील, धर्मातील, भाषेतील नागरिक मानतात, त्यांना आम्ही हिंदू मानतो,” असे रा.स्व. संघाचे सर्वेसर्वा मोहन भागवत यांनी केले होते. त्यावर पवार म्हणाले, “मोहन भागवत हे सर्व धर्मांना एकच समजतात, ही चांगली गोष्ट आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हिंदू-मुस्लिम त्यांना एक वाटतात, हेच आमच्यासाठी खूप आहे. त्यामुळे माझ्या ज्ञानातही भर पडली.”

Web Title: Improper postponement of municipal elections pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.