अंतर्गत रस्त्यांचा दर्जा सुधारणार
By admin | Published: March 3, 2016 01:39 AM2016-03-03T01:39:06+5:302016-03-03T01:39:06+5:30
तालुक्यातून गावागावांत जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास नको रे बाबा! अशी स्थिती सध्या जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची आहे.
पुणे : तालुक्यातून गावागावांत जाणाऱ्या रस्त्यांवरून प्रवास नको रे बाबा! अशी स्थिती सध्या जिल्ह्यातील बहुतांश रस्त्यांची
आहे. मात्र, आता यातील बरेच रस्ते चांगले होणार आहेत. राज्याने नुकतीच घोषीत केलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील २१६ किलोमीटर रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे. यात २०१५-१६ मधील ६० किलोमीटर व २०१६-१७ मधील १५६.४८ किलोमीटर रस्त्यांचा समावेश आहे. यासाठीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असून यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेसाठी केंद्राचा १८ हजार कोटींची व राज्य सरकारचा ४० टक्के पकडून या योजनेसाठी २७ हजार कोटी मिळणार आहेत. त्याचप्रमाणे राज्याने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नुकतीच जाहिर केली आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील रससत्यांची कामे होती घेतली जाणार आहेत.
पुणे जिल्ह्यातून रस्त्यांच्या दर्जान्नतीसाठी २०१५ - २०१६ मध्ये सुमारे ६० किलोमीटर लांबीची कामे व २०१६-१७ मध्ये १५६.४८ किलोमीटर लांबीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना आता गती मिळणार असून त्यांचा दर्जा सुधारणार आहे. यात सर्वात जास्त शिरूर तालुक्यात २२.११ किमीचे रस्ते, त्यानंतर इंदापूर २१.५०, खेड २०, दौंड १९.५०, जुन्नर १९, मावळ १७, पुरंदर १५.७०, हवेली १४.५०, भोर १३.२०, मुळशी ८.५, तर वेल्हे ८ असे २१६ किलोमीटरच्या रस्त्यांचा दर्जा सुधारणार आहे.
जिल्ह्यातील २१६ किलोमीटर रसत्यांच्या दर्जा सुधारण्यासाठी आंम्ही प्रस्ताव तयार केले असून ते प्रशासकीय मंजुरीसाठी पाठविले आहेत. ते अंतिम टप्पयात असून लवकरच त्याला मंजुरी मिळू शकते, असे सार्वजनिक बांधकामचे अभियंता आर.वाय. पाटील यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)