वाहतूक व्यवस्थेत झाली सुधारणा

By admin | Published: February 1, 2016 12:34 AM2016-02-01T00:34:08+5:302016-02-01T00:34:08+5:30

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने दंडवसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या कार्यपद्धतीची भांडाफोड ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून केली

Improvements in the traffic system | वाहतूक व्यवस्थेत झाली सुधारणा

वाहतूक व्यवस्थेत झाली सुधारणा

Next

पिंपरी : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना पकडून त्यांच्याकडून मनमानी पद्धतीने दंडवसुली करणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या कार्यपद्धतीची भांडाफोड ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून केली. त्यानंतर वाहतूक पोलिसांमध्ये बदल घडून आले असून, लोकमतच्या वृत्ताचा चांगला परिणाम पिंपरीतील मोरवाडी चौक, इंदिरा गांधी उड्डाणपूल, तसेच चिंचवड येथील छत्रपती शिवाजी चौकात दिसून येत आहे. वाहतूक पोलीस नेमक्या ठिकाणी उभे राहत आहेत, तर वाहनचालकही नियमांचे पालन करीत असल्याचे दृश्य दोन दिवसांपासून पाहावयास मिळत आहे.
प्रमुख चौकांमध्ये ज्या ठिकाणी न थांबता आडबाजूला थांबून नियम तोडून येणाऱ्या वाहनचालकाला अडवायचे. वाहन परवाना, कागदपत्रांची मागणी करायची, काही तरी कमतरता दाखवून दंडाची पावती फाडायची असे वाहतूक पोलिसांचे प्रताप सुरू असल्याची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने विशद केली. त्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच नियमानुसार काम करावे, अशी सक्त ताकीद देण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून चिंचवड आणि पिंपरीतील चौकांमध्ये अमूलाग्र बदल घडून आले आहेत. चिंचवड, तसेच मोरवाडी चौकात मध्येच थांबणाऱ्या रिक्षा नव्हत्या. पोलीस रस्त्याच्या बाजूला वरिष्ठांनी ठरवून दिलेल्या ठिकाणीच थांबले होते. घोळक्याने थांबलेले पोलीस हे नेहमीचे चित्र बदलले होते. आवश्यक तेवढेच पोलीस त्या चौकात अशी परिस्थिती विविध चौकांमध्ये पहावयास मिळत आहे. नाहक कोणालाही अडवणूक केली जात नाही.
कोणीतरी वाहनचालक नियमाचे उल्लंघन करेल, आपल्या जाळ्यात अडकेल, या भावनेने काम न करता प्रत्यक्षात वाहतूक व्यवस्थापनाचे काम करताना पोलीस दिसून आले. अवघ्या दोन दिवसांत अनुभवास आलेल्या या सकारात्मक अनुभवाबद्दल नागरिकांनी लोकमतचे आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Improvements in the traffic system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.