मद्यपी युवकांचा हातात कोयते घेत दहशत पसरविण्याचा प्रयत्न; हॉटेल आणि दुचाकींची मोडतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 09:44 PM2022-12-17T21:44:06+5:302022-12-17T21:53:25+5:30
बारामती शहरातील महाविद्यालय परीसरात चार ते पाच मद्यपी युवकांनी दुचाकीवर येत हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.
बारामती (प्रतिनिधी): बारामती शहरातील महाविद्यालय परीसरात चार ते पाच मद्यपी युवकांनी दुचाकीवर येत हातात कोयते घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.शहरातील चार पाच हॉटेल आणि दुचाकी या युवकांनी फोडल्या. त्यामुळे शहराच्या त्या भागात दहशत पसरल्याचे चित्र होते .शनिवारी(दि १७) सायंकाळी हा प्रकार घडला. सायंकाळी घडला.यामध्ये काही दुचाकींचे नुकसान झाले आहे.तर दोघेजण मद्यपी युवकांच्या हल्यात जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत.
पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी या प्रकाराला दुजोरा दिला आहे.याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक महाडीक म्हणाले,नशेतील युवकांनी हा प्रकार केला आहे.यापैकी एकजण अल्पवयीन आहे.तालुका पोलीसांनी सबंधित युवकांना ताब्यात घेतले आहे.तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय परीसरासह ,सराफ पेट्रोल पंप आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी फोडण्याचा प्रकार घडला आहे.दारुच्या नशेत हा प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे .
संध्याकाळी सातच्या सुमारास एमआयडीसी परिसरातील रेल्वे गेटनजिक एकाचा मोबाईल हिसकावत एका दुकानाची मोडतोड केली, तेथून पाटस रस्त्यावरील सराफ पेट्रोलपंपावर पेट्रोल टाकून पैसे मागणा-या कर्मचा-यावर कोयत्याने हल्ला केला, मात्र त्याने तो चुकविल्याने पेट्रोल भरण्यास आलेल्या एका व्यक्तीला कोयता लागल्याचे समजते.
त्या नंतर तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयासमोरील दुकान व हॉटेलमध्ये हे युवक घुसले.तेथे भांडणे करीत या युवकांनी हॉटेल आणि दुचाकीआणि चारचाकी वाहनांची मोडतोड केली. चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या, या शिवाय एकावर कोयत्याने वार केल्याचं समजते . त्या नंतर दुचाकीवरुन हातात कोयते घेऊन या युवकांनी शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार काही दुकानांच्या सीसीटीव्हीत कैद झाल्याची माहिती पुढे येत आहे .
पोलिसांनी दोन युवकांना ताब्यात घेतले आहे. संबंधित घटनास्थळी जात पोलीस माहिती घेत आहेत . आरोपींची नावे अद्याप निष्पन्न झालेली नाहीत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"