बारामतीत सर्पमित्राला विषारी नागाचा दंश; तब्बल २४ तासांनी शुद्धीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2023 10:15 AM2023-08-16T10:15:04+5:302023-08-16T10:15:22+5:30

सर्पमित्रासाठी तालुक्यातील नागरिकांकडून लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात होती, अखेर आज सकाळी ते शुद्धीवर आले

In Baramati Sarpamitra was bitten by a poisonous snake Conscious after almost 24 hours | बारामतीत सर्पमित्राला विषारी नागाचा दंश; तब्बल २४ तासांनी शुद्धीवर

बारामतीत सर्पमित्राला विषारी नागाचा दंश; तब्बल २४ तासांनी शुद्धीवर

googlenewsNext

मोरगाव : बारामती तालुक्यातील खराडेवाडी येथे काल सर्पमित्राला विषारी नागाने दंश केला असल्याची घटना घडली.  लोणी भापकर ता. बारामती येथील  विजय छबुराव यादव या सर्पमित्राचे नाव असून ते सर्प पकडण्यासाठी गेले असता सदर घटना घडली.

याबद्दल सविस्तर वृत्त असे की, लोणी भापकर ता. बारामती येथील विजय यादव हे गेल्या अनेक वर्षापासून विषारी व बिन विषारी साप पकडतात. कोणाच्या घरात, तर कोणाच्या दुकानात, अगदी गोठ्यात निघालेल्या सर्पास ते अनेक वर्षे जीवदान देत आलेले आहेत. बारामती तालुक्यात खराडवाडी येथील युवराज भापकर यांच्या घरी विषारी नाग निघाला असता ते पकडण्यासाठी गेले. गाईंच्या चाऱ्यासाठी बनवलेल्या मुरघासाच्या खड्ड्यामध्ये हा विषारी नाग होता.

 यादव हे नाग पकडत असताना त्यांच्या हातास नागाने चावा घेतला. मात्र अशाही परिस्थितीत त्यांना त्या नागास पकडून मोकळ्या रानात सोडून दिले. यानंतर यादव यांच्या प्रकृती अस्वस्थतामुळे उपचारासाठी बारामती येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. तब्बल २४ तासांपेक्षा अधिक काळ ते बेशुद्ध अवस्थेत होते.  यादव यांनी आतापर्यंत शेकडो सर्पांना जिवदान दिले असल्याने तालुक्यातील सर्पमित्र व शेतकऱ्यांकडून ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात होती. आज अखेर सकाळी ते शुद्धीवर आले. 

Web Title: In Baramati Sarpamitra was bitten by a poisonous snake Conscious after almost 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.