Pune: भविष्यात संप झाला तर PMPML चालक हाकतील ई-बसचा गाडा
By अजित घस्ते | Published: October 17, 2023 04:31 PM2023-10-17T16:31:24+5:302023-10-17T16:32:45+5:30
या प्रशिक्षणातून चालकांना ही नवीन ज्ञान होवून 'पीएमपी'ची वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याने आतापर्यंत ४५० चालकांना प्रशिक्षण दिल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले...
पुणे : 'पीएमपी' प्रशासनाने आपल्या चालकांना ई-बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत सुमारे ४५० चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यामुळे भविष्यात ठेकेदारांच्या ई-बस चालकांनी संप केला तरी, पीएमपीचे चालक ई बसचे स्टिअरिंग आपल्या हाती घेऊन स्वत: चालवू शकतात. या प्रशिक्षणातून चालकांना ही नवीन ज्ञान होवून 'पीएमपी'ची वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार असल्याने आतापर्यंत ४५० चालकांना प्रशिक्षण दिल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.
'पीएमपी'च्या ताफ्यात एकूण २ हजार ८९ बस आहेत. त्यात ९९१ बस या 'पीएमपी' च्या मालकीच्या आहेत. तर १ हजार ९८ बस या ठेकेदारांच्या आहेत. यात ६४० बस या 'सीएनजी वरील आहेत. तर, ४५८ ई-बस आहेत. २५ ऑगस्टला काही ठेकेदारांनी संप केला. त्यामुळे ई-बसच्या वाहतुकीला ब्रेक लागला होता. प्रवाशांना फटका बस् नये म्हणून पीएमपी प्रशासनाने चालकांना ई-बसचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याअनूशंगाने मागील काही दिवसांपासून चालकांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे.
ई-बस चालविण्यात पीएमपी चालकांना सुरूवातीला खूप अडचणी आल्या होत्या . पीएमपी' चालकांना सर्वच ज्ञान होणे गरजेचे आहे. ई-बस चालविण्याचा चालविण्याचा प्रयत्न केला पाहिजे याचा अनुभव होणे गरजेचे आहे. त्यानुसार दि. २६ ऑगस्ट पासून ४५० चालकांना ई-बस चालविण्याचा प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर पीएमपीएमएलच्या मालकीच्या बसेस चालविणाऱ्या परिवहन महामंडळाकडील इतर चालकांना देखील बस संचलनामध्ये उत्तम कामकाज, अपघात व ब्रेकडाऊन विरहीत सेवा, प्रवाशांशी सौजन्यपूर्ण वागणूक, आर.टी.ओ. चे नियम इ. विषयांवर प्रशिक्षण देण्यात येत आहे.
- सचिंद्र प्रताप सिंह पीएमपीचे व्यवस्थापकीय अध्यक्ष