Pune Crime: हवेली तालुक्यात तरूणीचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 12:04 IST2022-07-05T11:50:27+5:302022-07-05T12:04:12+5:30
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल

Pune Crime: हवेली तालुक्यात तरूणीचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथे एका तरूणीचा दगडाने ठेचून निर्घुनपणे खुन करण्यात आला असल्याची घटना उघडकीस आली आहे. थेऊर पोलीस चौकीच्या समोर असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत सदर अंदाजे १८ ते २२ वर्षे वयाच्या तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे. तिची ओळख पटलेली नाही.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, थेऊर चौकी व चिंतामणी हायस्कूल समोर यशवंत सहकारी साखर कारखान्याची मोकळी जागा आहे. मंगळवारी पहाटे नागरिकांना सदर मुलीचा मृतदेह आढळून आला. त्यांनी सदर बाब तात्काळ लोणी काळभोरपोलिसांना कळविली. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे व त्यांचे सहकारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहेत. डॉग स्कॉड पथकास पाचारण करण्यात आले आहे.