इंदापूर तालुक्यात सरपंचपदासाठी ४० तर सदस्यपदासाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 04:41 PM2022-12-01T16:41:23+5:302022-12-01T16:42:27+5:30
उद्या (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे...
इंदापूर (पुणे) : येत्या १८ डिसेंबर रोजी निवडणुकीस सामोरे जात असलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदाकरिता ४० तर सदस्य पदांसाठी १८२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उद्या (दि.२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
या निवडणुकीत सरपंचपदासाठी सर्वाधिक अर्ज झगडेवाडी (६) ग्रामपंचायत सदस्य पदासाठी लाखेवाडी (२४) या ग्रामपंचायतींमधून दाखल झाले आहेत. हिंगणगाव,मानकरवाडी,कुरवली,म्हसोबाची वाडी या ग्रामपंचायतीमधून सरपंचपदासाठी एक ही अर्ज दाखल झालेला नाही. जांभ ग्रामपंचायतीमधून दोन्ही पदांसाठी एक ही अर्ज आलेला नाही. उद्याच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी किती अर्ज दाखल होतात याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायतीचे नाव,सरपंचपद व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी आलेल्या एकूण उमेदवारी अर्जांची संख्या कंसात :
पडस्थळ -(१/१), हिंगणगाव-(०/ ४),अजोती- सुगाव- (१/३),माळवाडी -(२ /४),पिंपरी खुर्द-शिरसोडी-(१/ ७),बिजवडी -(२ /५),झगडेवाडी-(६ /९),डाळज नं. १ -(१ /८),डाळज नं.२ - (३/ १६),डाळज नं. ३-(१/९), न्हावी-(१ /३),थोरातवाडी- (१/१३),कळाशी-(३ /१०), रणमोडवाडी-(१ /२),जांभ-(०/०),मानकरवाडी-( ०/ ६),कुरवली-(० /१),म्हसोबाचीवाडी- (०/१),मदनवाडी -(२/ ५),लाखेवाडी-(२ /२४),बोरी-(२/ ६),रेडणी- (४ /१६),बेलवाडी-(१/ ३),डिकसळ-(२/ १४), गंगावळण -(१/ २),सराटी-(१/ १०).