Chandni Chowk Bridge Demolished: अवघ्या पाच सेकंदात झाला जमीनदोस्त; अखेर चांदणी चौकातील पूल इतिहासजमा
By नितीश गोवंडे | Published: October 2, 2022 01:25 AM2022-10-02T01:25:24+5:302022-10-02T01:27:05+5:30
मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पडण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकातील जुना पूल मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी पडण्यात आला. अवघ्या पाच सेकंदात हा पूल जमीनदोस्त झाला. ६०० किलो स्फोटकांच्या माध्यमातून हा पूल पाडण्यात आला. आता उर्वरित पाडकाम पोकलेनच्या सहायाने पडण्याचे काम सुरू झाले.
रात्री दहापासूनच चांदणी चौकाकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. पूल रविवारी पहाटे एकच्या सुमारास पाडण्यात आला. हा पूल पाडण्याचे काम नोयडा येथील व्टिन्स टॉवर पाडणाऱ्या कंपनीने केले. पुण्यात पहिल्यांदाच स्फोटकाच्या मदतीने पूल पाडण्यात आला. त्याआधी सायंकाळी सात पासूनच पुलाच्या २०० मीटर परिसर निर्मनुष्य करण्यास सुरवात करण्यात आली होती. सायंकाळनंतर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला होता. साताऱ्याकडून येणाऱ्या जड वाहनांना दहावाजेपासून मागे थांबवण्यास सुरुवात केली होती.
तसेच, डुक्कर खिंड येथून पुढे वाहने येऊन नये म्हणून त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. मुंबईकडून येणारी वाहने दहानंतर शहराच्या मध्य भागातून वळवण्यात सुरूवात केली. तसेच, उर्से टोलनाक्यावर जड वाहने थांबवण्यात सुरूवात करण्यात आली होती. यानंतर सकाळी आठपर्यंत या पुलाचा राडा-रोडा देखील उचण्यात आला. रात्री दहापासूनच पाठीमागे फुडमॉल, हॉटेल, धाबे, मोकळ्या जागा या ठिकाणी जड वाहतूक थांबवण्यास सुरुवात केली होती. यासाठी पुणे महामार्ग पोलिस विभागाचे १०० अधिकारी व कर्मचारी खंडाळा, वडगाव, उर्से टोलनाका, सारोळा, कराड, भुइंड या ठिकाणी तैनात करण्यात आले होते.
कंट्रोल ब्लास्ट चा वापर...
चांदणी चौकातील हा पूल पाडण्यासाठी कंट्रोल्ड ब्लास्ट पद्धतीचा वापर करण्यात आला. हा ब्लास्ट करताना लोखंडी जाळीच्या आठ लेअर लावण्यात आलेल्या होत्या. त्याच्या किती यावेळी जिओ पद्धतीच्या पांढऱ्या कापडाचा धूळ न उडण्यासाठी वापर करण्यात आला होता. पूल पडल्यानंतर दहा मिनिटातच जेसीबीच्या सहायाने राडाराडा बाजूला करण्याचे काम सुरू झाले होते. या ब्लास्ट दरम्यान संपूर्ण पूल मात्र जमीनदोस्त झाला नाही. उर्वरित स्ट्रक्चर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
पुणे: चांदणी चौकातील पूल पाडतानाचा क्षण; अवघ्या काही सेकंदात झाला जमीनदोस्त.#Punehttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/k934l7HKZI
— Lokmat (@lokmat) October 1, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"