कर्वेनगरात तरुणीवर भररस्त्यावर बळजबरी; माथेफिरुला जमावाकडून चांगलाच चोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 09:25 AM2023-04-19T09:25:42+5:302023-04-19T09:25:53+5:30

महिलेने मोठ्याने आरडाओरड केल्यानंतर त्या परिसरात मोटारसायकलवरून जाणारे तरुण तिच्या मदतीला धावून गेले

In Karvenagar a young woman was forced to marry Good chop from the crowd on the head | कर्वेनगरात तरुणीवर भररस्त्यावर बळजबरी; माथेफिरुला जमावाकडून चांगलाच चोप

कर्वेनगरात तरुणीवर भररस्त्यावर बळजबरी; माथेफिरुला जमावाकडून चांगलाच चोप

googlenewsNext

शिवणे/कर्वेनगर : कामावरून घरी पतरणाऱ्या एका महिलेच्या खांद्यावर हात ठेवून एका माथेफिरू तरुणाने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. महिलेने मोठ्याने आरडाओरड केल्यानंतर त्या परिसरात मोटारसायकलवरून जाणारे एक तरुण तिच्या मदतीला धावून गेले. त्यांनी महिलेला त्या माथेफिरूच्या तावडीतून सोडविले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले.

ही घटना रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास कर्वेनगर रस्त्यावर घडली. याप्रकरणी राजा नेत्राम यादव (२२, नक्षत्र सोसायटी, पटवर्धन बाग, एरंडवणा) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कर्वेनगर परिसरातील एका रुग्णालयामध्ये काम करणारी तरुणी तिचे काम संपवून घरी पायी निघाली होती. रात्री पावणेआठच्या सुमारास पटवर्धन बाग या परिसरात पोहोचल्यावर अचानक मागून एका तरुणाने तिच्या खांद्यावर हात ठेवला. ती घाबरली आणि आरडाओरड करायला लागली त्यावेळी त्याने तिचे तोंड दाबून तिला रस्त्यावर पाडले व तिच्यावर बळजबरी करायला लागला. त्यामुळे तिने आरडाओरड करायला सुरुवात केली. त्यावेळी त्या परिसरातील अभिषेक कांबळे त्यांच्या पत्नीसह निघाले होते. त्यांनी तरुणीचा आवाज ऐकून तिच्या मदतीसाठी धाव घेतली इतर व्यक्तीही जमा झाले. त्यांनी राजा यादव याला चोप देऊन जवळच असलेल्या अलंकार पोलिस ठाण्यामध्ये नेले व पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक करिष्मा शेख करत आहेत.

Web Title: In Karvenagar a young woman was forced to marry Good chop from the crowd on the head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.