खडकवासल्यात सोनेरी आमदारांच्या पुत्रापेक्षा राष्ट्रवादीचे दाेडके श्रीमंत; तापकीर, दोडकेंच्या तुलनेत वांजळे उच्चशिक्षित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 04:10 PM2024-11-06T16:10:02+5:302024-11-06T16:11:46+5:30
भाजपचे भीमराव तापकीर बारावी पास, सचिन दोडगे दहावीपर्यंत तर मयुरेश वांजळे उच्चशिक्षित असून बीई (सिव्हिल) झाले आहेत
पुणे: खडकवासला मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांच्यात तिरंगी लढत होणार असून, उमेदवारांमध्ये भाजपचे भीमराव तापकीर, सोनेरी आमदार म्हणून ओळखले जाणारे दिवंगत रमेश वांजळेंचे सुपुत्र मनसेचे मयूरेश वांजळे यांच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन दाेडके हे अधिक श्रीमंत असल्याचे शपथपत्रावरून स्पष्ट झाले आहे. तापकीर यांच्याकडे १४ कोटी ९४ लाख १४ हजार ४०६ रुपये, तर सचिन दोडके यांच्याकडे ५७ कोटी ८३ लाख ४५ हजार ४१८ रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या तुलनेत वांजळे ८४ लाख ६३ हजार ७६३ रुपयांचे धनी आहेत. तापकीर, दोडके यांच्या तुलनेत वांजळे हे उच्चशिक्षित आहेत.
महायुतीचे उमेदवार भीमराव तापकीर
एकूण मालमत्ता - १४ कोटी ९४ लाख १४ हजार ४०६ रुपये. (जंगम - स्वत:कडे १ कोटी ८९ लाख ७९ हजार ५८८, तर पत्नीकडे ३३ हजार ८४ हजार ८१८ रुपयांची मालमत्ता आहे. स्थावर - स्वत:कडे १० कोटी १३ लाख ५० हजार रुपये, तर पत्नीकडे २ कोटी ५७ लाख रुपयांची मालमत्ता आहे.)
कर्ज - स्वत:च्या नावे १ लाख ७५ हजार ५६५ रुपये, तर पत्नीच्या नावे ५७ लाख ३७ हजार ६६५ रुपये.
राेख - स्वत:कडे २ लाख १० हजार रुपये, तर पत्नीकडे १ लाख ५ हजार रुपये.
व्यवसाय - शेती
शिक्षण - बारावी पास
वाहने व दागिने - स्वत:कडे ३० लाख रुपयांची टोयाटो इनोव्हा गाडी, २०० ग्रॅम साेने; तर पत्नीकडे ३२० ग्रॅम सोने आहे, तसेच धनकवडी येथे ४ सदनिका, कात्रज व आंबेगाव बुद्रुक येथे अनुक्रमे दोन सदनिका आहेत. धनकवडी येथे ६१ हजार ५०० चौरस फुटांची बिनशेती जागा आहे. तापकीर यांची जांभळी गट नंबर येथे ४ एकर १७ आर, तर पत्नीची ७ एकर १७ आर शेतजमीन आहे.)
राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके
एकूण मालमत्ता - ५७ कोटी ८३ लाख ४५ हजार ४१८ रुपये (स्थावर - स्वत:कडे ५६ कोटी ९१ लाख १३ हजार १५३ रुपये, तर पत्नीकडे २२ लाख ८ हजार रुपये.)
व्यवसाय - शेती व बांधकाम
कर्ज - ४ कोटी ८३ लाख ९१ हजार ६१३ रुपये.
राेख - स्वत:कडे ५ लाख ५८ हजार रुपये, तर पत्नीकडे २ लाख १० हजार रुपये आहेत.
दागिने - स्वत:कडे ४४ ग्रॅम वजनाचे ३ लाख ४३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, पत्नीकडे ५०० ग्रॅमचे ३९ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व १ लाख रुपयांची १ किलो चांदी आहे.
शिक्षण - दहावीपर्यंत
वाहने - २ चारचाकी आणि २ दुचाकी असून, त्याची किंमत ३८ लाख ४८ हजार ८८ रुपये आहे.
मनसेचे उमेदवार मयूरेश वांजळे
एकूण मालमत्ता - ८४ लाख ६३ हजार २८६ रुपये. (जंगम - स्वत:च्या नावे १९ लाख २९ हजार २३३ रुपये, तर स्थावर - ६५ लाख ३४ हजार ०५३ रुपयांची मालमत्ता आहे.)
वाहने व दागिने - ९६ लाख रुपयांचे १२० तोळे सोने, १ टोयाटो चारचाकी आणि दोन दुचाकी अशा १० लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत.
कर्ज - १ कोटी २८ लाख रुपये.
शिक्षण - बीई (सिव्हिल)