Pune: लातूरमध्ये कोयत्याने वार करून चोरी, फरार आरोपीच्या जेजुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 04:29 PM2023-10-10T16:29:23+5:302023-10-10T16:29:56+5:30

आरोपीस जेजुरी पोलिसांनी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील एका शेतात पकडले...

In Latur, the Jejuri police caught the absconding accused of stealing and stabbing him with a coyote | Pune: लातूरमध्ये कोयत्याने वार करून चोरी, फरार आरोपीच्या जेजुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pune: लातूरमध्ये कोयत्याने वार करून चोरी, फरार आरोपीच्या जेजुरी पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जेजुरी (पुणे) : लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे पिग्मी एजंट अच्युत शेळके यांची दुचाकी गाडी अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्याकडील एक लाख रुपये जबरदस्तीने चोरून नेले. फरार झालेल्या शुभम जाधव या आरोपीस जेजुरीपोलिसांनी पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील एका शेतात पकडले. 

जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे (दि. ८) रोजी पिगमी एजंट अच्युत शेळके हे एजन्सीचे पैसे गोळा करून घरी जात असताना त्यांची दुचाकी अडवून त्यांच्यावर कोयत्याने वार केले. नंतर एक लाखाची रक्कम लुटून आरोपी शुभम जाधव हा फरार झाला होता. सदर आरोपी जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील डोंगर भागात असणाऱ्या पिंगोरी गावातील एका नातेवाईकांच्या शेतात लपून बसला होता. याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून आरोपीला अटक करण्यात आली.

बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, भोर विभागाचे पोलिस आधिकारी तानाजी बरडे जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलीस हवालदार दशरथ बनसोडे, प्रशांत पवार, राहुल माने, योगेश चीतारे या पोलीस पथकाने या आरोपीस सापळा लावून पिंगोरी शिताफीने जेरबंद केले आहे. सदर आरोपी एका शेतात लपून बसला होता. पोलिसांनी सापळा रचून शिताफीने आरोपीस ताब्यात घेतले. या आरोपीने गुन्हा कबूल केला असल्याचे जेजुरी पोलिसांनी सांगितले.

Web Title: In Latur, the Jejuri police caught the absconding accused of stealing and stabbing him with a coyote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.