महाराष्ट्रात महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील; अंबादास दानवेंचा मिश्किल टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 09:06 AM2024-03-06T09:06:45+5:302024-03-06T09:07:13+5:30
लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही
वाघोली : आगामी लोकसभा महाराष्ट्रातून महायुतीच्या ४८ पैकी ४५ जागा निवडून येतील असे महायुतीच्या नेत्यांनी सांगितले आहे. त्यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिश्कीलपणे टोला लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून महायुतीच्या ४८ नाही तर ५०-६० जागा निवडून येतील असं ते यावेळी म्हणाले आहेत.
वाघोली येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ शिवसैनिकांच्या भेटीला दानवे आले असता ते बोलत होते. पुढे दानवे म्हणाले कि, महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासक राज असल्याने जनतेत आक्रोश आहे. सर्वसामान्य माणसाला अधिकारी वर्गाने धारेवर धरले आहे. अधिकाऱ्यांपेक्षा लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या समस्येची जाण असते. लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीच्या भीतीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरकार घेत नाही. तर देशात मोदी हारेल बघत राहा असे देखील मिश्किल पणे सांगितले. शिंदे सरकारने आरक्षणाचे प्रणेते जरांगे पाटील यांना फसवले असल्याने मराठा समाज त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. तर तीन पक्षांना उमेदवार मिळत नसल्याने इतर पक्षातील उमेदवार आयात करावे लागत आहेत. असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सारिका हरगुडे, पोपट शेलार,रवी कुटे,वसंत जाधवराव,संग्राम जाधवराव व इतर मान्यवर उपस्थित होते.