बारामतीच्या एमआयडीसीमध्ये कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड पडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 14:54 IST2022-05-19T13:57:26+5:302022-05-19T14:54:54+5:30
कंत्राटी कामगाराला पुरेशी सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप मृत्यू झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांचा आरोप

बारामतीच्या एमआयडीसीमध्ये कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड पडून मृत्यू
मेखळी : बारामतीतील एमआयडीसीमध्ये बुधवार (दि- १९ मे) रोजी लोखंडी पाइप तयार करणाऱ्या आयएसएमटी कंपनीत सकाळी दहाच्या सुमारास सकाळ शिफ्टमध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कामगाराच्या डोक्यात लोखंडी रॉड पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बारामतीतील खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले ,मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
बारामती तालुक्यातील मेखळी येथील रहिवासी संतोष बापूराव देवकाते (वय २८) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नांव आहे. काम करीत असताना संरक्षणासाठी सेफ्टी म्हणून त्या कंत्राटी कामगाराला पुरेशी सुरक्षा पुरवली नसल्याचा आरोप मृत्यू झालेल्या कामगाराच्या नातेवाईकांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर केला आहे. नातेवाईक व गावातील मित्रपरिवाराने बारामती मधील खाजगी दवाखान्यात मोठी गर्दी केली असून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.